Home धाराशिव दाबका येथे हनुमान जयंती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे...

दाबका येथे हनुमान जयंती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

447

आशाताई बच्छाव

1001386288.jpg

दाबका येथे हनुमान जयंती निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन. उमरगा प्रतिनिधी : तालुक्यातील दाबका येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि .५/०४/२५ ह.भ.प. भिम महाराज मुळज यांची किर्तन सेवा होणार आहे.तर दि.६/०४/२५ ह.भ.प. गर्जे गुरुजी माळेगाव दि.७/०४/२५ ह.भ.प. गणेश महाराज शास्त्री बीड दि.८/०४/२५ ह.भ.प . विठ्ठल महाराज गाडगे शिवनखेड दि.९/०४/२५ ह.भ.प. काकासाहेब महाराज ( पहाणे)आळंदी दि.१०/०३/२५ ह.भ.प. निवृत्ती महाराज जांभळवाडीकर दि.११/०४/२५ ह.भ.प. अवधूत पुरी महाराज आष्टा (ज) दि.१२/०४/२५ ह.भ.प. लक्ष्मण महाराज काळे पंढरपूर यांची कीर्तन सेवा होणार आहे. तर प्रवचन ह.भ.प.आशुतोष महाराज ,ह.भ.प. भीम महाराज ,ह.भ. प. शेखर सगर गुरुजी ,ह.भ.प.हेबाडे गुरुजी, ह.भ.प. तेजनाथ महाराज, ह.भ.प.लक्ष्मीबाई बालाजी सूर्यवंशी यांची प्रवचन सेवा होणार आहे .पहाटे चार ते सहा काकडा आरती, सहा ते साडेसहा विष्णुसहस्त्रनाम ,साडेसहा ते साडेबारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी साडेबारा ते साडेतीन गाथा भजन साडेतीन ते पाच प्रवचन , पाच ते साडेसहा हरिपाठ , सात ते नऊ किर्तन सेवा, नऊ ते दहा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती हनुमान देवस्थान कमिटी व समस्त दाबका ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Previous articleचैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleभोकरदन पोलीस स्टेशनचे पीआय श्री बिडवे साहेब यांच्या अथांग प्रयत्नाने जे पी एल व्हॉलीबॉल स्पर्धेची आज उदघाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.