आशाताई बच्छाव
भोकरदन पोलीस स्टेशनचे पीआय श्री बिडवे साहेब यांच्या अथांग प्रयत्नाने जे पी एल व्हॉलीबॉल स्पर्धेची आज उदघाटन
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
भोकरदन येथील पोलीस स्टेशनचे पीआय श्री बिडवे साहेब यांच्या संकल्पनेतून व अथांग प्रयत्नाने आज भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय समोरील मैदानावरती हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार व रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व जालना जिल्ह्याचे एसपी बंसल साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनाच्या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी खेळाचे महत्व खेळाडूंना समजून सांगितले कोणताही खेळ खेळत असताना खेळ खेळणाऱ्या मध्ये सर्व जाती धर्माचे खेळाडू असतात व ते मिळून मिसळून हे सामने खेळतात यामध्ये कोण कोणत्या जातीचा किंवा धर्माचा असा भेदभाव न करता जातीय सलोख्यातून खेळाडू खेळत असतो त्याची जिद्द तो कसा खेळतो याच्यावर तिची पार्क व त्याचे गुण निवडले जातात खेळाडू कोणत्याही खेळाचा असो त्यांनी सामना खेळत असताना जिद्दीने व जिंकण्याच्या उद्देशानेच खेळ खेळा पाहिजे मोठ्या उत्साहाने खेळाडूने मैदानात उतरावे आणि ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रकारे खेळ खेळला असेल अशांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या खेळल्या गेलेल्या व केलेल्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने दात दिली गेली पाहिजे असे भाषणावेळी त्यांनी सांगितले साहेबांनी त्यांच्या शालेय जीवनामधील खेळाबाबत एक किस्सा या ठिकाणी सांगितला की आम्ही खो-खो खेळ खेळायचो ते खेळत असताना अनेक अडचणी येत होत्या पळत असताना पडायचं लागायचं परंतु आम्हाला कोणत्या प्रकारची गोळी किंवा औषध मलम त्यावेळेस मिळत नव्हते पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हती आता तर सर्व सुविधायुक्त सामने खेळले जातात त्यांचे शालेय जीवनातील मित्र श्री त्रिंबकजी पाबळे हे सुद्धा या कार्यक्रमास हजर होते त्यांनी त्यावेळेसचा एक खिसा या ठिकाणी सांगितला त्रिंबक पाबळे हे वेळेचे सोबती होते त्या दोघातील खिसा या ठिकाणी त्यांनी उलगडून सांगितला व राजकीय टोलेबाजी मारली कार्यक्रमा हजर असणाऱ्यांमध्ये एकच विनोदी हास्य निर्माण झाले होते या उद्घाटना वेळी खेळायला सुरुवात करण्याअगोदर हवेमध्ये फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी पत्रकार बंधू तसेच लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे या हॉलीबॉल च्या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली .






