आशाताई बच्छाव
EXCLUSIVE! एसपींचा मोठा निर्णय ! “आता ऑन द स्पॉट एफआयआर !”
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा वाढत्या गुन्हेगारीवर चाप लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मोठा निर्णय घेतला. आता ऑन द स्पॉट एफआयआर दाखल होणार असून, यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनला मोबाईल किंवा गोपनीय माहीती द्वारे दखलपात्र अपराध घडल्याची माहीती मिळाली असता लागलीच अधिकारी व कर्मचारी व डी.बी. पथकासह घटनास्थळी लॅपटॉप, स्कॅनर असणारे प्रिंटर असे सरकारी वाहनाने घेऊन पोहचतील.
दखलपात्र अपराध घडल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी जावुन तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार संगणकावर तक्रार नोंदवुन घेतील.
तक्रारदार यांची संगणकावर नोंदविलेल्या तक्रारीची प्रिन्ट काढुन त्यावर तक्रारदार याची सही जागीच घेतील व तक्रारदार यांनी दिलेली तक्रारची प्रत ही स्कॅनरद्वारे पोलीस स्टेशनच्या ईमेल वर पाठवतील. त्यामुळे जलद गतीने तपास होऊन गुन्हेगार पोलिसांच्या गळाला लागतील! मात्र ही उपाय योजना किती यशस्वी होते याचे उत्तर संभाव्य काळात मिळणारच आहे.






