Home बुलढाणा BIG BREAKING जिल्हा हादरला..! पुन्हा एक मर्डर; रताळीत खून…३ दिवसापासून होते गायब

BIG BREAKING जिल्हा हादरला..! पुन्हा एक मर्डर; रताळीत खून…३ दिवसापासून होते गायब

103

आशाताई बच्छाव

1001386328.jpg

BIG BREAKING

जिल्हा हादरला..! पुन्हा एक मर्डर; रताळीत खून…३ दिवसापासून होते गायब
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- सिंदखेड राजा जिल्ह्यात अलीकडच्या काळात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. आज, ५ एप्रिलच्या सकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत पन्हा एका खनाची घटना उघडकी पुन्हा एका खुनाची घटना उघडकीस आली आहे. रताळी येथे श्री. गायकवाड यांच्या शेतातील विद्युत रोहित्राजवळ एक प्रेत आढळून आले. प्रेतावर मारहाणीच्या खुणा असल्याने हा खून असल्याच्या निष्कर्षा प्रत पोलीस पोहोचले आहेत. नारायण भाऊराव मैंद (५०, रा. रताळी, मूळ राहणार, येवता ता. चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण भाऊराव मैंद हे मूळचे चिखली तालुक्यातील येवता गावचे रहिवासी होते. मात्र स्थानिक वादातून दोन वर्षांपूर्वी गाव सोडून ते सासुरवाडी असलेल्या रताळीत कुटुंबासह राहत होते. गेल्या ३ दिवसांपासून ते गायब होते.. कुटुंबीयांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान आज सकाळी श्री. गायकवाड यांच्या शेतातील रोहित्राजवळ नारायण मैंद पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण भाऊराव मैंद हे मूळचे चिखली तालुक्यातील येवता गावचे रहिवासी होते. मात्र स्थानिक वादातून दोन वर्षांपूर्वी गाव सोडून ते सासुरवाडी असलेल्या रताळीत कुटुंबासह राहत होते. गेल्या ३ दिवसांपासून ते गायब होते.. कुटुंबीयांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान आज सकाळी श्री. गायकवाड यांच्या शेतातील रोहित्राजवळ नारायण मैंद यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी साखरखेर्डा पोलिसांनी धाव घेतली. नारायण मैंद यांच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे हा खूनच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठवण्यात आला आहे. काही संशयीतांची नावे देखील पोलिसांना प्राप्त झाली असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासला वेग दिला आहे..

Previous articleEXCLUSIVE! एसपींचा मोठा निर्णय ! “आता ऑन द स्पॉट एफआयआर !”
Next articleतहसिलदार अजित दिवटे अॅक्शन मोडवर ! – अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ४ वाहनावर कारवाई !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.