Home बुलढाणा तहसिलदार अजित दिवटे अॅक्शन मोडवर ! – अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ४...

तहसिलदार अजित दिवटे अॅक्शन मोडवर ! – अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ४ वाहनावर कारवाई !

103

आशाताई बच्छाव

1001386349.jpg

तहसिलदार अजित दिवटे अॅक्शन मोडवर ! – अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ४ वाहनावर कारवाई !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू असून, महसूल पथक अॅक्शन मोडवर आले आहे. एक एप्रिल रोजी दुसरीबीड येथे तर सिंदखेडराजा येथे सुद्धा एका वाहनावर कारवाई करण्यात आली आहे, दोन्ही वाहने किनगाव राजा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन एप्रिल रोजी हिवरखेड येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली तसेच मलकापूर पांगरा येथे तीन एप्रिल रोजी एका वाहनावर कारवाई करण्यात आली. गत ३ दिवसांमध्ये 4 वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अवैध रेती वाहतूक बंद करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी दिला आहे.
त्यामुळे अजित दिवटे सध्या चांगलेच अॅक्शन मोडवर आले असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर होणाऱ्या कारवाई मुळे वाहतूक करणाऱ्याच्या मनात धडकी भरली आहे.

Previous articleBIG BREAKING जिल्हा हादरला..! पुन्हा एक मर्डर; रताळीत खून…३ दिवसापासून होते गायब
Next articleआज अन्वा येथे निघणार आजुबाई देवीची स्वारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.