आशाताई बच्छाव
आज अन्वा येथे निघणार आजुबाई देवीची स्वारी
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 05/04/2025
भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आजुबाई देवी यात्रेस सोमवार पासून सुरुवात झाली असून चैत्र तृतीयेला आजुबाई चा मंडप उभारून उत्सवास प्रारंभ झाला आहे.आज मध्यरात्री पासून ते रविवार सहा रोजी पहाटे तीन वाजता आजुबाई ची देवीची स्वारी निघणार आहे आजुबाई देवी प्रसिद्ध माता जगदंबेच्या आठ रूपा पैकी भोकरदन तालुक्यातील आजुबाई देवी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे दरम्यान अनुभव येथे आजोबांचे जन्मस्थळ असून सुमारे 500 वर्षापासून हा उत्सव सुरू आहे. अन्वा हे गावाचे नाव अनंतपुर या नावाने ओळखले जात होते. आज ही अनुवाद आजूबाई देवीची दररोज आरती होते. व मंदिरात स्वयंभू दशनीय मूर्ती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देवीचे दोन मंदिर असून या देवीची पूजा अर्चना सोनू महाराज, दीपक महाराज करतात तर दुसरे मंदिर गावाच्या बाहेर आहे समाधी स्थळ देवीची पूजा अर्चना प्रफुल्ल रवी महाराज करतात. त्यामुळे दोन्ही मंदिर नवरात्रोत्सवास निमित्त येथे भाविकांची गर्दी होते दुसऱ्या अश्विन महिन्यात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवाला महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात या राज्यातील भाविक देवी दर्शनासाठी दरवर्षी शेकडो भावी या उत्सवात येते असतात.
तसेच अन्वा या गावांतील पुरुष आणि महिला व परिसरातील भाविक भक्तांची यात्रेस आणि दर्शनासाठी फार मोठया प्रमाणात गर्दी असते.






