Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

81

आशाताई बच्छाव

1001387627.jpg

शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सम्राट अशोक यांची जयंती उत्साहात साजरी

भंडारा– पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार शाळेचे सम्राट अशोक यांची 2329 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध ,सम्राट अशोक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम ,यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले .त्यानंतर संपूर्ण भिक्षू संघाच्या उपस्थितीत संघ वंदना घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधि बौद्ध होते.यावेळी पत्रकार संजीव भांबोरे ,धम्मचारींनी प्रज्ञा सखी, ब्रह्मचारी भदंत वज्रपाणी, गुलाब घोडके यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मिलिंद गोंडाने यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सदर कार्यक्रमात सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे संचालन विनय ढोके यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर गजभिये यांनी तर आभार आशिष मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पंकज वानखडे, प्रशांत बोदेले, प्रशांत कांबळे, दीपक वालदे ,राकेश मेश्राम, प्रमोद वासनिक ,अंबादास मेश्राम,त्रिसरण उके यांनी सहकार्य केले.

Previous articleगावठी कट्टा विक्री करणारे दोघे संशयित आरोपी जेरबंद
Next articleसुझलाँन कंपनीच्या टाँवरचे फाऊंडेशन चोरी करणारी टोळी गजाआड, निजामपूर पोलिसांची धडक कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.