Home उतर महाराष्ट्र हुक्काबारवर पोलिसांचा छापा ; दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हुक्काबारवर पोलिसांचा छापा ; दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

78

आशाताई बच्छाव

1001383613.jpg

हुक्काबारवर पोलिसांचा छापा ; दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल                                अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

कल्याण रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हुक्काबारावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी छापा टाकून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आली.
राज घनश्याम खाटिक रा. अहिल्यानगर, अभिषेक सुरेश खाटिक रा. अहिल्यानगर असे गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपींची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना मिळालेल्या माहितीनुसार कल्याण रस्त्यावरील एका हॉटेलच्या पत्र्याच्या शेडमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकास सूचना देऊन पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Previous articleम्हसरूळ येथील मा.सरपंच गणेशराव जाधव यांचे निधन
Next articleधन्वंतरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत रोगनिदान शिबिर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.