आशाताई बच्छाव
धन्वंतरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत रोगनिदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक ०४/०४/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की, ग्रामपंचायत कुंभारझरी व बालाजी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल, सांगळे हाॅस्पिटल डोळ्यांचा व दातांचा दवाखाना, वात्सल्य बालरुग्णालय, देऊळगाव राजा, वाघ हाॅस्पिटल टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारझरी ग्रामस्थांसाठी व गरजू रुग्णांसाठी दिनांक २३/०३/२०२५ रविवार रोजी भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये डॉ.स्वाती सांगळे यांच्या हस्ते डोळ्यासंबधी सर्व जसे की, मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळ्यांमधील पडद्याची शस्त्रक्रिया चष्म्याच्या नंबरची तपासणी डोळ्यांचे इतर आजारांचे निदान व उपचार याविषयी सविस्तर माहिती दिली व दातांच्या संबंधित रोग्यांची तपासणी करून डॉ. ज्ञानेश्वर सांगळे यांनी मोफत दंत तपासणी करून एका दिवसात रूट कॅनॉल, दातांच्या दुखण्यावर उपचार, नवीन दात बसवणे, लहान मुलांचे दात आणि विशेष दंत उपचार याविषयीरोग्यांना योग्य मार्गदर्शन केले.यासोबतच बालाजी मल्टीस्पेशालिटी ॲक्सीडेंट हाॅस्पिटल यांच्या वतीने अस्थिरोग तज्ज्ञ डॉ सुभाष शिंगणे व डॉ.मनोहर वाघ यांनी सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी शरीरातील गाठी जुने हाडांचे रोड व प्लेटचेऑपरेशन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेअंतर्गत एक्सीडेंट व फ्रॅक्चर संबंधी माहिती वअस्थिरोग रोगाविषयी रोग्यांची तपासणी करून मोफत उपचार केले.तसेच वाघ हॉस्पिटल टेंभुर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमोल वाघ यांनी रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकार तपासणी करून विविध आजारांसाठी मोफत मार्गदर्शन केले व आरोग्यवर्धक सल्ला देऊन यावर अनेक मोफत सवलतीचा फायदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना अंतर्गत एक्सीडेंट मधील सर्व फ्रॅक्चर हाडांचे व जबड्यांचे, घासलेला गुडघा व खंब्याचे संपूर्ण साधा बदली ऑपरेशन मोफत, औषधीचे मोफत वाटप, करण्यात आले असून सर्व प्रकारच्या आजारावर योग्य तो उपचार करून नागरिकांना एक सुखद धक्का दिल्याबद्दल धन्वंतरी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कुंभारझरी ग्रामपंचायत आयोजित मोफत भव्य रोग निदान शिबिराचा लाभ कुंभारझरी तसेच पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे.






