आशाताई बच्छाव
श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे श्री प्रभु श्रीरामचंद्र जन्म महोत्सव साजरा
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे आज दिनांक ०६/०४/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री प्रभु रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा करतात. मंदीरा समोर भव्य दिव्य मंडप टाकण्यात येतो, मंदिराच्या कळसावर भगवा ध्वज लावतात, तसेच गणपती बाप्पा च्या मंदिरा जवळ भगवा ध्वज उभारला जातो व पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते,मंदिरा समोरुन श्री प्रभु रामचंद्र ची भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात येते, तसेच फटाकेची आतिषबाजी करून व वाजत गाजत संपूर्ण गावतुन मिरवणूक काढण्यात येते तसेच गावातील महिला मंडळी आप आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून श्री प्रभु रामचंद्र ची पुजा करतात व गावातील प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते, तसेच श्री प्रभु रामचंद्र ची मिरवणूक परत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात परत येते,या मिरवणुकीत महिला मंडळ व नवतरुण युवक, जेष्ठ नागरिक, आसपास गावातील नागरिक उपस्थित रहातात, श्री क्षेत्र वालसा वडाळा येथे सर्व धर्म एकत्र येऊन श्री प्रभु रामचंद्र जन्म महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो.






