आशाताई बच्छाव
मिशन ZEED ची पालक व विद्यार्थी सभा संपन्न
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर व पातूरडा बू येथील जी प हायस्कूल येथे मिशन ZEED साठी पालक आणि विद्यार्थी यांची सभा संपन्न झाली असून या सभेला गटशिक्षण अधिकारी श्री ताले साहेब व गट समन्वयक श्री मिलिंद सोनवणे सर यांची उपस्थिती होती.
बुलढाणा जिल्हा परिषद च्यावतीने सन 2025-26 या वर्षापासून जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळेमधून इयता 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरीब व होतकरू गुणवत्ता धारक विद्यार्थी साठी mission zeed या उपक्रमाची अंमल बजावणी करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळेमधून ईयता 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या गरीब व होतकरू गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांसाठी या योजनेची आमल बजावणी प्रस्तावित आहे.ग्रामीण भागातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शिकवणी वर्गाच्या माध्यमातून NEET/JEE/CET साठी अतिरिक्त स्वरूपात दर्जेदार व उत्तम पूरक शैक्षणिक सुविधा साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत गरीब व होतकरू गुणवत्ता धारक विद्यार्थ्याच्या डॉक्टर,इंजिनियर,संशोधक अशा विविध शेत्रातील पात्रता,स्पर्धा परीक्षा साठी संधी उपलब्ध करून देणे हा योजने मागील उद्देश आहे.या योजनेसाठी विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असावा.पालकाचे वर्षात उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असावे.इयत्ता 9 वी मध्ये विद्यार्थी किमान 85 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असावा. इयता 8 वी मध्ये विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS पास असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.जिल्हा परिषद शाळेतून मार्च2025 मध्ये इयत्ता 10 ची परीक्षा देणारे विद्यार्थी या साठी पात्र असतील.
शिक्षण अधिकारी( योजना) जिल्हापरिषद बुलढाणा हे या योजनेचे जिल्हा स्तरावर आमल बजावणी प्रमुख राहणार आहे. तालुकास्तर समनवयक व संनियांत्रित तथा आमल बजावणी जवाबदारी गत विकास अधिकारी प स याची राहणार आहे.शाळेने निवड केलेल्या विद्यार्थी ची अंतिम परीक्षा होणार आहे.इयत्ता 10 वीच्या बेसवर ही 75 मर्काची पेपर 11 एप्रिल ल होणार आहे.परीक्षेच्या निकाल अंती निवड यादी ही गटविकास अधिकारी यांच्या कडे देण्यात येईल.गटविकास अधिकारी यांच्या मार्फत संबधित विद्यार्थ्यास नियोजित शैशनिक संस्था कडून पूरक शैक्षणिक सुविधा मार्गदर्शन व साहित्य 11 व 12 साठी उपलब्ध करून देण्याची तयारी करावी.या साठी निवड झालेल्या विद्यार्थ्या ना. जी प जू कॉलेज खामगाव व जी प जु कॉलेज बुलढाणा येथे 11 व 12 साठी प्रवेश घ्यावा लागणार आहे.या साठी दि 4 एप्रिल रोजी संग्रामपूर व पातूरडा बू या जी प हायस्कूल मध्ये विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित केला होता. पातूरडा येथून 15 विद्यार्थी यांची यादी देण्यात आली आहे.त्यांना 9 मध्ये 85 क्या वर टक्के आहेत.या सभेला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य उपस्थित होते.सोबतच सर्व शिक्षक उपस्थित होते.या वेळी टाले साहेब,मिलिंद सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.सभेचे प्रास्ताविक श्री प्रवीण बुंदे सर यांनी केले.
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थी व कुटुंबाचे राहणीमान उंचावे या साठी मां मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब बुलढाणा यांनी हा चांगला अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.श्री टाले साहेब गटशिक्षण अधिकारी संग्रामपूर
या पालक व विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित असलेल्या विद्यार्थी याना या उपक्रम व पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी संबोधित केले व विद्यार्थी याना प्रोत्साहित केले. मिलिंद सोनवणे गट समन्वयक संग्रामपूर