Home मराठवाडा उदगीर परिसरात ६ तास वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त

उदगीर परिसरात ६ तास वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त

95

आशाताई बच्छाव

1001384389.jpg

उदगीर परिसरात ६ तास वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त
बी.जी.शिंदे उदगीर / प्रतिनिधी
उदगीर विधानसभा मतदारसंघातील उदगीर जळकोट परिसरात सायंकाळी सहा वाजता वारा पाऊस आला, लगेच वीज पुरवठा खंडित झाला, वीज पुरवठा सायंकाळी सहा वाजताच्या पासून ते रात्री ११ वाजता पर्यंत खंडित राहिला, गेलेली रात्र येथील नागरिकांसाठी खूप त्रासदायक ठरली, ज्या मुलांची अकरावी, नर्सिंग, कोर्सेस, कॉम्प्युटर कोर्सेस, बीसीए, बीसीएस, बीए, बीकॉम, बीएससी, आर्ट, कला, वाणिज्य प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांच्या आता परीक्षा सुरू आहेत. ती मुले दिवसभर आपल्या अभ्यासात मग्न असतात, रात्री त्यांना पुरेश्या झोपेची गरज असते. नौकरदार, कर्मचारी वर्ग दिवस भराच्या कामातून थकलेले असतात त्यांनाही रात्री शांत झोपेची आवश्यकता असते. दिवसभर घरातील कामे करुन थकलेल्या गृहिणींना देखील रात्री शांत झोपेची आवश्यकता असते. आता उन्हाळा आहे पंखे, कुलर, एसी शिवाय लोकांना झोप लागत नाही. त्यातच डासांचा धुमाकूळ झोपेत विघ्न टाकण्याचे कार्य करत असते, उन्हाळ्यात सर्वांच्या घरी पाण्याची खूप आवश्यकता असते. या आधुनिक काळात सर्वांच्या घरी, पाण्यासाठी बोअरवेल आहेत, त्यातील पाणी विजे शिवाय वर काढू शकत नाही, अशात एखाद्याने घरच्या पाण्याच्या टाकीत वापरायचे पाणी कालच भरून ठेवले नसेल तर त्याची फजिती झाली असेलच यात शंका नाही.
या सर्व घटनेला वारा – पाऊस हे जबाबदार आहेत का? स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क १६:००% हे महावितरणला ग्राहकांकडून महावितरण ग्राहकांकडून घेत असते, ग्राहकांना उत्तम सुविधा द्यायला काहीच हरकत असायला नको? असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण होतांना दिसून येत आहे.
ग्राहकांना सुविधाजनक, महावितरण नीट व्यवस्थीत नियोजन करून, कुशल कर्मचारी वर्ग ठेऊन, ग्राहकांना उत्तम सुविधा का देत नाही हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
आज जग अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स ला कसे अंतराळातून परत पृथ्वीवर आणले गेले पाहत आहे. आपण थोडे वारा – पाऊस आले की लगेच वीज पुरवठा खंडित कसे होते हे पाहत आहोत.
महावितरणने ग्राहकांना होणाऱ्या अश्या असुविधेकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे. कुठे खांब वाकल्या गेले, तारा जास्त झुलत आहेत. विजेच्या तारा कुठे वारा – पाऊस आल्यास एकमेकांना स्पर्श तर होणार नाहीत ना, असतील तर महावितरण ने लगेच सुधार दुरुस्ती करून घेतले पाहिजे.
समोर मान्सून येत आहे रोज सोसाट्याचा वारा — पाऊस येणारच सतत झड २४ तास राहणारच मग महावितरण दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित ठेवणार का? ही नामुष्की महावितरणवर येऊ नये या साठी योग्य उपाय योजना महावितरणने करून घेतल्या पाहिजेत. ग्राहक जसे महिन्याला वीज बिल भरतो तसेच त्याला महावितरणशी अपेक्षा ही बिलच्या रकमे पेक्षा दुप्पट असतात हे महावितरण ने विसरता कामा नये. शेवटी ग्राहक आहेत तर महावितरण आहे हे महावितरण ने लक्षात ठेवले पाहिजे.असे प्रखड मत ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले. याची दखल त्वरित घेण्यास्तव त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, अध्यक्ष, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना ई-मेलद्वारे ग्राहकांच्या व्यथा मांडल्या आहेत.

Previous articleमिशन ZEED ची पालक व विद्यार्थी सभा संपन्न
Next articleप्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात ब्रह्या भोजनाचा महाप्रसाद वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.