आशाताई बच्छाव
अड्याळ येथे प्रधानमंत्री बीमा सखी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व विमा सखी कार्यक्रमाचे आज 6 फेब्रुवारीला आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा(जिल्हा प्रतिनिधी )अड्याळ येथे दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी गुरुवारला दुपारी 12 वाजता वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ येथे प्रधानमंत्री बीमा सखी योजना चे मार्गदर्शन शिबिर व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात करण्यात आलेले आहे. करिता या शिबिराच्या लाभ घेण्याचे आवाहन एलआयसी शाखा प्रबंधक पवनी प्रवीण देव , एलआयसी चे विकास विकास अधिकारी अमित दीपटे , प्रणव गजभिये विकास अधिकारी , पंकज वैद्य विकास अधिकारी,विमा अभिकर्ता मुनेश्वर बोदलकर अड्याल यांनी केलेली आहे .करिता अड्याळ परिसरातील बहुसंख्य महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. विमा सखीची शैक्षणिक पात्रता दहावी व बारावी असून या योजनेचा आपण लाभ घ्यावा असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आलेले आहे.






