आशाताई बच्छाव
डॉ.धनश्री अंकित वडजे यांच्या डेंटल क्लिनिकचा अभिनव उपक्रम.
▪️ शिबिराच्या माध्यमातून 350 दंतरुग्णांची मोफत तपासणी.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड शहरातील वडजे डेंटल क्लिनिकचा वर्षपूर्ती सोहळा निमित्ताने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभरात अत्यंत कमी दरात दर्जेदार उपचार देत गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देत डॉ. धनश्री अंकित वडजे यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. वडजे डेंटल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारचे दंत उपचार माफक दरात उपलब्ध आहेत. आर्थिक दृष्ट्या
दुर्बल रुग्णांसाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे दंत तपासणी रूट कॅनल, ब्रेसेस, दंत स्वच्छता व पॉलिशिंग, दंत प्रत्यारोपण, नवीन दात लावण्याची सुविधा, बालदंत चिकित्सा आणि इतर उपचार अत्यंत कमी खर्चात केले जातात. वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त दिनांक ९ डिसेंबर व १० डिसेंबर रोजी सर्वांसाठी मोफत दंत तपासणी मोफत औषधी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरामध्ये ३५० रुग्णांनी आपले तपासणी अन्य चिकित्सा विषयी मार्गदर्शन घेतले असून आलेल्या सर्व रुग्णांनी डॉ. धनश्री अंकित वडजे यांच्याकडून मिळालेल्या उपचाराबद्दल समाधान व्यक्त करत आहेत. आलेल्या रुग्णांना त्यांच्या समस्या जाणून घेऊन योग्य उपचार व समाधानकारक वागणूक मिळाल्याबद्दल रुग्णांकडून आनंद व्यक्त होत आहे. दंत रुग्णाविषयी माहिती दर तीन महिन्यांनी ब्रश बदलला पाहिजे तर सहा महिन्यांनी दातांची तपासणी केली पाहिजे माझ्या प्रवासामध्ये रुग्णांनी व कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. तसेच वैद्यकीय संस्था मुखेड व सर्व डॉक्टरांचे आभार मानते.पुढील काळात व्यापक दृष्टिकोन ठेवून नवीन तंत्रज्ञान द्वारे रुग्णांना सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.