आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन सोयाबीन कमी दराने खरेदी झाल्यास कृ.उ.बा.समिती सभापतींच्या दालनाला कुलूप ठोकू:- संभाजी ब्रिगेड नांदुरा..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-नांदुरा तालुक्यातील शेतकरी हा अस्मानी संकटांशी सामना करत आहे.सर्वत्र अक्षरशः ढगफुटी होत असून दसरा दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.सोयाबीन कुजले,सडले,कोंब आले मातीमोल झाले.जे काही थोडेफार पीक वाचले त्याच्या भरवशावर शेतकऱ्याला बी – बियाणे,खते,फवारणी,मजुरी अशी सर्व देवाण-घेवाण करून जर काही थोडाफार पैसा हाती आलाच तर त्यात दिवाळीसारखा खर्चिक सण साजरा करणे,मुलाबाळांना कपडे घेणे,फराळ,फटाके एवढे सर्व करणे.हे शक्य तर नाही पण त्यानेही सणवार परिवारासोबत आनंदात साजरा करण्याचे स्वप्न पाहिले असतात.अन् आपले अडते व व्यापारी हे अशा नाजूक वेळेत शेतकऱ्यांची अडवणूक करून शासकीय हमिभावापेक्षा दीड ते दोन हजारांनी कमी दराने सोयाबीन मागत आहे. यापुढे हे शेतकऱ्याचे रक्त पिणे थांबले पाहिजे.अडते व्यापारी त्यांची मनमानी करून शेतकऱ्यांचे रक्त पितच असतील तर तुमचा उपयोग तो काय? असा सवाल संभाजी संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी विचारला.संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन सभापतींना सोयाबीनच्या गंजांवर घेऊन गेले अन् सभापती,अडते,व्यापारी यांची चांगलीच कान उघडणी केली.सभापती श्री भगवान धांडे यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम उभा असून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिले.यावेळी संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील,जिल्हा सचिव मंगेश सोळंके, मा.जिल्हा संपर्क प्रमुख भागवत मुंडे,जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे,जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,पत्रकार प्रफुल्ल बिचारे,तुषार इंगळे,गोपाळ देवकर,देविदास शित्रे,गणेश शित्रे,गजानन वानखडे, निंबाजी तायडे ,कैलास अहिर, विजय गव्हाणे,प्रतीक सोळंके ,बळीराम देवकर ,हाजी शेख गफ्फार ,अब्दुल रहमान, दयाराम वाकोडे, मनकर्णाबाई वानखेडे,राजू हिवाळे, सौरभ केदार ,ऋषिकेश तांगळे, राजू तायडे, शंकर तायडे, राजेश सपकाळ,भारत कोळस्कार,संजु इंगळे, नारायण वानखेडे, मुकेश फणसे,गजानन लांजुळकर,निंबाजी वानखेडे यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन अडते ,व्यापारी यांच्याकडून कमी दराने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले तर तुमच्या सभापती कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडू :- संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील