आशाताई बच्छाव
नांद्रा वरदडी येथील अवैध दारू विक्री तत्काळ बंद करा महिलांची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांच्याकडे मागणी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा मेहकर तालुक्यातील मौजे नांद्रा वरदडी या गावांत अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सर्रास व उघडपणे सुरू आहे.कित्येक वर्षा पासून गावांत दिवस रात्र अवैध दारू विक्री सुरू असल्याने अनेक जन व्यसनाधीन झाले आहेत .दारू पाई अनेकांच्या घरांत रोज भांडणं तंडा चालू असतो त्यामुळे गावांतील अनेक कुटुंबांतील महिलांना या मानसिक त्रासचा सामना करावा लागतो. गावांत जेमतेम सर्वांची गरिबी परिस्थिती आहे सर्व जन रोज मजरी करून आपला उदरनिर्वाह करतात .अशातच अनेक महिलांचे पती कष्टांचे मजुरीचे पैसे दारू मध्ये जास्त प्रमाणात नेऊन घालतात त्यामुळे कुंटबावर कधी ,कधी उपासमारीची देखील वेळ येते आहे. गावांत अवैध दारू विक्री केली जाते तसेच बाहेरून लोकं येऊन गावांत जुगार ही खेळला जातो . तरूण पिढी ही व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने या त्रासाला कंटाळून गावांतील महिलांनी अनेकवेळा मेहकर पोलिस स्टेशन येथे अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी तक्रार व निवेदन दिले होते .पण गावांतील अवैध दारू विक्री काही बंद झाली नाही. त्यामुळे दि.२१ऑक्टोबर रोज सोमवारला नांद्रा वरदडी या गावांतील महिलांनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन मा.जिल्हा अधिकारी साहेब व जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब बुलडाणा यांच्याकडे . नांद्रा वरदडी या गावांतील अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी अशी लेखी निवेदनाद्वारे तक्रार व मागणी केली व गावांत शांतता नांदावी अशी हात जोडून विनंती केली.