आशाताई बच्छाव
संवर्गातील मुलींना मिळणार आता OBC, SEBC आणि EWS फुकट उच्च शिक्षण
युवा मराठा न्यूज ठाणे ब्युरो चीफ :- फय्याज मोमीन
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना चांगली आनंदाची बातमी दिली आहे. त्याच बरोबर आता उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना १००% फी सवलतीचा निर्णय घेऊन OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना राज्य सरकारनं मोठी भेट जाहीर केली आहे.
दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या ओबीसी मुलींना फी माफी देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी यंदाच्या बजेटमध्ये केली. केवळ मेडिकलच नाही तर अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ अशा विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थिनी याचा फायदा होणार आहे.
अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्याबाबात निर्णय झाला आहे. GR जाहीर जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील OBC, SEBC आणि EWS संवर्गातील मुलींना उच्च शिक्षणात 100 टक्के फी सवलतीचा लाभ घेता येणार आहे.