
आशाताई बच्छाव
साकोली येथे राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त 26 जूनला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली तालुक्याच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जून 2024 रोज बुधवार ला सकाळी अकरा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती साकोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन साकोली येथील तहसीलदार निलेश कदम यांच्या हस्ते होईल तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मदनभाऊ रामटेके हे राहतील.करिता या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रबोधनकार भावेश कोटांगले, मनोज बोपचे ,संजय टेंभुर्णे, धनंजय धकाते ईश्वर धकाते , उमेश भोयर ,यशवंत बागडे, मनोहर गंथाळे,यांनी केलेले आहे.