Home नाशिक नाशिकच्या पंचवटी भागात तणावपूर्ण शांतता

नाशिकच्या पंचवटी भागात तणावपूर्ण शांतता

179

आशाताई बच्छाव

1000487542.jpg

नाशिकच्या पंचवटी भागात तणावपूर्ण शांतता
(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ)
नाशिक:-शहरातील पंचवटी भागात असलेल्या राजवाडा परिसरात आज कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लेटरपँडवर टाईप केलेला मजकूर एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावणारा असल्याने, राजवाडा परिसरात या लेटरपँडवरील पत्रकाचे अज्ञात व्यक्तीने वाटप केल्यानंतर त्यावरील मजकूराचे वाचन झाल्यावर नागरिकांच्या भावना संतप्त झाल्या असून राजवाडा परिसरातील नागरिक लगेचच रस्त्यावर उतरले व मोर्चाला सुरुवात केली.काही अनूचीत प्रकार घडू नये म्हणून पंचवटी पोलीसांनी त्या लेटरपँडवरील पत्रकात नमूद असलेल्या हिंदूवाहिनी संघटनेच्या शहराध्यक्षाच्या कुटूंबियांना ताब्यात घेतले आहे.पंचवटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, पंचवटी परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचे बघावयास मिळाले.