Home अमरावती बारूद च्या काड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक.

बारूद च्या काड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक.

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_063602.jpg

बारूद च्या काड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक.
———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
अमरावती जिल्ह्यात स्पोटक परवान्याचे उल्लंघन होत असून तिघा विरुद्ध गुन्हा दाखल होऊन, २६५ स्पोटक कांड्या डइटओनएटर्स केबल सह कार जप्त करण्यात आले. तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना २१ मार्च रोजी रात्री कुरा ते तिवसा कोंडण्यपूर वाय पॉईंट जवळ ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून स्फोटक कांड्या, डीटोनेटिंग केबल,कार व दुचाकी जप्त करण्यात आले. खुरा ठाण्याच्या हद्दीतून स्फोटकांचा अवैध वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबी ला मिळाली होती. त्या आधारे कार व दूध चाकी स्वार अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी गजानन मारोतराव डंबारे वय ४४रा. आमला ता. चांदुर रेल्वे हा त्याच्या कार मध्ये १४६स्फोटक कांड्या व ९९ नग डीटोनेटिंग केबल सह मिळून आला. तसेच त्याच्या सोबतच्या शुभम श्रीकृष्ण सुलताने वय 22 व अविनाश राजेंद्र सुलताने वय 30 दोन्ही रा.गोठा ता. तिवसा हे त्यांच्या दुचाकी वर ११९नगस्फोटक कांड्याव८०नगडिटोनेटींग केबल सहा आढळून आले त्या एकूण २६५नगकांड्या,१७९डिटोनेटींग केबल एम एच ४६एक्स४६७८ही३.५० लाख रुपये किमतीची कार व एक दिवसाची असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडे ना परवाना नाकागदपत्रे, अटक तिन्ही आरोपी हे ब्लास्टिंग साठी वापरण्यात येणारे स्फोटके खाजगी वाहनांमध्ये बाळगुन वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडे स्पोटक बाबाची कागदपत्रे तथा शॉर्ट फायरचा परवाना नव्हता. तो सोबत न बाळगता आरोपी पर्वण्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करून तसेच सुरक्षा विषयक उपाययोजना न करता हाताळताना आढळल्याने त्यांच्याविरुद्ध पुरा पोलिसात भारतीय स्फोटक अधिनियम १८८४चेकलम९ब,१२ब, भादळीच्या कलम २८६,३३६,१८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसातर्फे अवैध व्यावसायिक, अवैद्य शास्त्र व स्फोटके बाळगणारे, गुंड प्रवृत्तीचे इसमावर कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सागर हटवार व मूलचंद भांबुरकर, अमलदार अमोल देशमुख, मंगेश लाकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन भाऊ, संजय प्रधान यांच्या पथकाने केली.

Previous articleसंचमान्यता निकष निश्चित करणे बाबतचे निफाड निवासी तहसीलदार राहुल मुळीक यांना निवेदन —
Next articleनाशिकरोडला “द बर्निग ट्रेनची” घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here