Home नाशिक संचमान्यता निकष निश्चित करणे बाबतचे निफाड निवासी तहसीलदार राहुल मुळीक यांना निवेदन...

संचमान्यता निकष निश्चित करणे बाबतचे निफाड निवासी तहसीलदार राहुल मुळीक यांना निवेदन —

79
0

आशाताई बच्छाव

IMG_20240322_193454.jpg

संच मान्यतेचा नवा निर्णय वादात—

संचमान्यता निकष निश्चित करणे बाबतचे निफाड निवासी तहसीलदार राहुल मुळीक यांना निवेदन —

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या निफाड शाखेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शासनाने निर्गमित केलेल्या संच मान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या सुधारित निकषास विरोध असलेबाबत , बालकांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन संचमान्यता निकष निश्चित करणे बाबत या आशयाचे निवेदन निफाड निवासी तहसीलदार राहुल मुळीक यांच्यामार्फत देण्यात आले.
सदर निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे,राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर यांचे निर्देशानुसार निवेदन देते वेळी शिक्षक समितीचे माजी राज्य उपाध्यक्ष पांडुरंग कर्डीले,जिल्हा संघटक दत्तू सानप, तालुका नेते अविनाश बागडे, तालुकाध्यक्ष संजय गवळी,तालुका सरचिटणीस खंडू किट्टे,दत्ता साळवे ,अविनाश बिदे हे उपस्थित होते,यावेळी नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी आपले निवेदन म मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येईल असे सांगितले,याप्रसंगी शिक्षक समिती पदाधिकारी यांनी सुधारित संच मान्यतेच्या जी आर सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर आणणारा असल्याने आचार संहितेनंतर ताबडतोब रद्द करण्याचा शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी करणेत आली आहे,तसेच लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुर्धर आजार,दिव्यांग,गरोदर महिला,स्तनदा माता,सेवानिवृत्तीस सहा महिने बाकी असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी केली असता याबाबत योग्य पुरावा विनंती अर्ज करावा निश्चित सहानुभूती पूर्वक विचार करून नाव वगळनेत येईल असे नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी सांगितले. निवेदनात राज्यप्रतिनिधी अनंत गोसावी, राज्यकार्यकारिणी सदस्य रविंद्र चव्हाणके,रमेश गांगुर्डे, श्रीकांत देवरे ,कार्याध्यक्ष नवनाथ सुडके,भगवान बर्डे,नंदकिशोर घोडेकर,दिलीप कातकाडे, वरील सर्व पदाधिकारी आदींच्या सह्याचे निवेदन देण्यात आले

Previous articleवटपौर्णिमा
Next articleबारूद च्या काड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here