Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर शहर हद्दीवर ‘बिबट्या’ कॅमेऱ्यात कैद

श्रीरामपूर शहर हद्दीवर ‘बिबट्या’ कॅमेऱ्यात कैद

77
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_174245.jpg

श्रीरामपूर शहर हद्दीवर ‘बिबट्या’ कॅमेऱ्यात कैद           श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ७ जवळ असणाऱ्या महाले पोदार शाळेच्या पुढे असणाऱ्या गोठ्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबटया कैद झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर हद्दीवर बिबट्या आल्याचे यातून स्पष्ट होत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, बेलापूर नाक्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या महाले पोदार शाळेच्या पुढे विरेंद्र यादव यांचा गायांचा गोठा आहे. या गोठ्याजवळ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे. आज पहाटे एक बिबट्या या ठिकाणी आला. त्याने कुत्र्यावर झडप मारली मात्र हे कुत्रे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर बिबट्याही त्याच्या दिशेने जाताना या सीसीटीव्हीत दिसत आहे. बिबट्याच्या अचानक येण्यामुळे येथे बांधलेली गायी-म्हशी जनावरं काही काळ बिथरली होती. अगदी शहराच्या हद्दीवर हा बिबट्या आल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Previous articleBreaking News: नांदेड शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के
Next articleअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांना निवेदन सादर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here