Home Breaking News शहीद जवान सचिन मोरे यांना पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण*

शहीद जवान सचिन मोरे यांना पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण*

243
0

*शहीद जवान सचिन मोरे यांना पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण*

मालेगांव,(श्रीमती आशा बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्यूज)-
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून पुलाचे बांधकाम सुरू असतांना या ठिकाणी सचिन मोरे संरक्षणासाठी कार्यरत होते. दरम्यान, या भागातील नदीला चीनकडून अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढल्याने दोन जवान त्यात वाहून जात होते. त्यांना वाचवण्यासाठी सचिन यांनी पाण्यात उडी घेतली. या वेळी दोघांना वाचवताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.त्यांच्यावर आज त्यांच्या मुळगावी साकोरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे,खासदार सुभाष भामरे,खासदार भारती पवार,आमदार सुहास कांदे,माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here