• Home
  • *जिल्ह्यात पाच ठिकाणी कोविड* *रूग्णालयाची मागणी*

*जिल्ह्यात पाच ठिकाणी कोविड* *रूग्णालयाची मागणी*

*जिल्ह्यात पाच ठिकाणी कोविड* *रूग्णालयाची मागणी*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)

कोल्हापूर जिल्ह्यात वडगांव , इचलकरंजी ,पन्हाळा-शाहुवाडी ,
शिरोळ येथे सुसज्ज कोविड रूग्णालयाच्या मागणीचे निवेदन खासदार धैर्यशिल माने यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तसेच शासकीय व खासगी रूग्णालयात कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी सद्धा बेड्स उपलब्ध होत नसुन उपचाराविना अनेकांना जिव गमवावा लागत आहे.
कोरोना बाधित रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न चालू आहेत .
काही ठिकाणी आँक्सिजन , व्हेंटिलेटरची सोयी अपुऱ्या असल्याने पाँझिटीव्ह रूग्णांचे उपचाराअभावी मृत्यूला सामोरे जाव लागत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील वडगांव मधे १००बेडचे, इचलकरंजी २५०बेडचे, शिरोळ२००बेडचे , पन्हाळा- शाहुवाडी २०० बेडचे या सर्वच ठिकाणी तातडीने सुसज्ज कोविड रूग्णालय उभी करावीयासाठी नवनिर्वाचीत हातकणंगले लोकसभेचे खासदार मा.धैर्यशिल माने यांनी जिल्ह्याधिकारी श्री दौलत देसाई यांना निवेदन दिले.

anews Banner

Leave A Comment