*”माता नसेची तु वैरीणी”*
*चंदनपुरीच्या पिंजारपाडयाजवळ पाच महिन्याचे बाळ सोडून मातेचे पलायन*
*कळवाडी,( जगदिश बागूल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपूरी जवळील पिंजारवाडी येथे काल एका पाच महिन्याच्या बाळाला मक्याच्या शेतात फेकून दिल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती चंदनपुरीचे माजी सरपंच राजेंद्र नंदलाल अहिरे पाटील यांनी किल्ला पोलीस स्टेशनला दिल्याने, पोलिसांनी सदरचे बाळ ताब्यात घेतले असून, त्या बाळाला फेकून देणाऱ्या मातेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
