Home नाशिक लासलगाव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सवपर्यंत श्री हनुमान चालीसा पठण सोहळा–

लासलगाव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सवपर्यंत श्री हनुमान चालीसा पठण सोहळा–

13
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_070426.jpg

लासलगाव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सवपर्यंत श्री हनुमान चालीसा पठण सोहळा–

दैनिक युवा मराठा
 निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

गेल्या वर्षी शहरात होळी ते हनुमान जन्मोत्सव हनुमान चालीसा पठण कार्यक्रम विविध मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आला होता त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच आयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सुमारे ११ हजार भाविकांनी १ लाख हनुमान चालीसा पठण यशस्वी संपन्न केले होते.
रविवार (दि.२४) होळीच्या शुभमुहूर्तावर गणेश नगर येथील गणेश मंदिरात या हनुमान चालीसा पठाणचा शुभारंभ होणार आहे. सोमवार ( दि २५) रोजी सर्वे नंबर ९३ ग्रामपंचायत पटांगण, मंगळवार ( दि २६) रोजी लक्ष्मीनारायण मंदिर गोपाळकृष्ण मंदिर परिसर,शनिवार ( दि ३०) रोजी श्री हनुमान मंदिर होळकरवाडी, मंगळवार (दि.२) एप्रिल रोजी दुर्गा माता मंदिर गणेश नगर , शुक्रवार (दि.५) रोजी ज्ञानेश्वर महाराज मंदिर,शनिवार (दि.६) रोजी क्रांती चौक श्रीराम नगर , तर गुढीपाडव्याचे औचित्य साधून मंगळवार (दि.९) रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रम होणार आहे.
शनिवार (दि.१३) रोजी हनुमान मंदिर ब्राह्मणगाव विंचूर, ,सोमवार (दि.१५) रोजी हनुमान मंदिर कोटमगाव,
मंगळवार (दि.१६) रोजी इच्छापूर्ती गणेश मंदिर, श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बुधवार (दि.१७) रोजी दुपारी ४ वाजता श्री बाबा अमरनाथ मंदिर एसटी डेपो लासलगाव, गुरुवार (दि.१८) रोजी श्री काशी विश्वेश्वर मंदिर पिंपळगाव नजिक, शुक्रवार (दि.१९) रोजी यशवंत व सुमन नगर, शनिवार (दि.२०) रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्यानगर,रविवार (दि.२१) रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टाकळी विंचूर, सोमवार (दि.२२) रोजी श्री हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन, व हनुमान जन्मोत्सव मंगळवार (दि २३) रोजी श्रीराम मंदिर लासलगाव येथे होणार आहे. सर्व कार्यक्रम हे रात्री ९ ते १० या वेळेत संपन्न होतील. लासलगाव व परिसरातील भाविकांनी या हनुमान चालीसा पठण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Previous articleलासलगाव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सवपर्यंत श्री हनुमान चालीसा पठण सोहळा–
Next articleनांदेड लोकसभा निवडणूक 2024- काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मुखेड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here