Home बीड सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तासभरात पकडले

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तासभरात पकडले

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_081037.jpg

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तासभरात पकडले

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/गेवराई दि: १९  तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील मनुबाई जवळा परिसरातील एक सराफा व्यापारी धनसावंगी या ठिकाणी जात असताना मनुबाई शिवारात तिघांनी लुटले. या घटनेची माहिती मिळताच तलवाडा, गेवराई पोलीसांनी चक्र फिरवून, नाकाबंदी करून तिघांना ताब्यात घेतले. सदरील घटना आज सकाळी ०९ वाजताच्या सुमारास घडली आहे. सराफा व्यापारी व्यापारासाठी तलवाडा परिसरातील मनुबाई जवळा या मार्गाने धनसावंगी या ठिकाणी जात होता. रस्त्यातच तीन चोरटे वाट पाहत दबा धरून बसले होते. व्यापारी येताच शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील लाखो रुपये किमतीचे सोने, चांदीसह रोख रक्कम घेऊन पोबारा केला. व्यापाऱ्याने तात्काळ तलवाडा व गेवराई पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ नरके व गेवराई पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष जंजाळ, सपोनि दीपक लंके यांनी तपासाची चक्रे फिरवून एक तासात तीन संशयित आरोपींच्या मुस्क्या आवळल्या असून यात एक गेवराईचा तर दुसरा अंबडचा आरोपी असल्याचे समजते. तिसऱ्या आरोपी संबंधित काही माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची व सराफा व्यापाऱ्याचे नाव समोर येईल.

Previous articleआमलकी एकादशीचे व्रत – कथा आणि महत्व
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी माढा तालुका कार्यकारणी जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here