Home नांदेड बेबरा येथील जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी..

बेबरा येथील जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी..

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20240319_202359.jpg

बेबरा येथील जलजीवन योजनेची चौकशी करण्याची मागणी..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर प्रतिनिधी ; देगलूर तालुक्यातील बेबरा येथील प्रधानमंत्री जलजीवन पेय जल योजना या कामांमध्ये करोडो रुपयाची अपरात्र झाल्याने या कामाची त्वरित चौकशी करून पेजल योजनेतील भ्रष्टाचार थांबविण्याची मागणी उमेश श्रावणराव पाटील शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
देगलूर तालुक्यातील बेबरा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री जलजीवन योजनेचे जवळपास दोन करोड रुपयांचे काम मंजूर झाले आहे या कामात सुरुवात करण्याच्या अगोदरच ठेकेदारा मार्फत सरपंच अशी संगणमत करून वरील कामाकरता गावकऱ्यांची समिती गठित केलेली नाही आणि मागील महिन्यात 90 लाख रुपयाची बँकेतून उचल करण्यात आलेली आहे त्याचा नंतर गावातील जुन्या योजनेचे पाईप व इतर साहित्य वापरून काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येतात असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदरील कामासाठी शासनाचे कोणतेही अभियंताचे जाय मोक्यावर दौरा झालेला नाही कामाची पाणी तर नाहीच त्यामुळे दर्जाहीन काम होत आहे त्यामुळे येथील संबंधित ठेकेदाराच्या कामाची गुण नियंत्रक समितीच्या मार्फत त्वरित कामाची चौकशी करून ठेकेदारास काळे यादीत टाकून अनामत रक्कम जप्त करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे व गावातील नागरिकांसाठी शासकीय योजनेचे काम दर्जेदार करून देण्यात यावे जेणेकरून शासनाची सदरील कामाची दुसऱ्यांदा गरज पडणार नाही .
या प्रधानमंत्री जलजीवन पेय जल योजनेच्या कामाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा दिनांक 26 मार्च रोजी जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर उमेश श्रावणराव पाटील शिंदे बापूराव शिवाजीराव बामणे, विष्णुदास प्रकाश पाटील, आदी गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleदेगलूर काँग्रेसला खिंडार बळेगावकर, मिसाळे, नाईक, देशमुख आदींचा भाजप प्रवेश
Next articleबाभळेश्वर येथे महिला दिन साजरा….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here