Home नांदेड जागतिक महिला दिनानिमित्त धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तत्ववान...

जागतिक महिला दिनानिमित्त धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तत्ववान महिलांचा केला सन्मान.

10
0

आशाताई बच्छाव

IMG_20240308_203617.jpg

जागतिक महिला दिनानिमित्त धर्मभूषण
ॲड.दिलीप ठाकूर यांनी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तत्ववान महिलांचा
केला सन्मान.

मनोज बिरादार
मराठवाडा विभागीय संपादक

नांदेड -जागतिक महिला दिनानिमित्त धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कर्तुत्ववान महिलांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला. ज्येष्ठ समाजसेवक ॲड. चिरंजीलाल दागडिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय होती.
भाजपा,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,गीता परिवार व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने दागडीया प्रांगण , भसिन मंगल कार्यालयासमोर, गोवर्धन घाट नांदेड येथे शुक्रवारी सकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला. योग गुरु रवी कडगे यांनी सुरुवातीला प्राणायामचे प्रात्यक्षिक घेतले. महाशिवरात्रीच्या औचित्य साधून संध्या पोपशेटवार,ॲड. दागडिया यांनी भजने म्हटली. कार्यक्रम घेण्याची भूमिका संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट केली. महिलांच्या रूपाने घराघरात अष्टभुजा देवी कार्यरत असल्यामुळे पुरुषांचे जीवन सुखकर झाले. मोदीजींनी महिलांसाठी आरक्षण दिल्यामुळे अनेक महिलांना लोकसभा, विधानसभा मध्ये जाण्याचा योग येणार आहे. त्यामुळे महिलांनी अधिक जोमाने सामाजिक क्षेत्रात काम करावे असे आवाहन ठाकूर यांनी केले. यावेळी ॲड. दागडीया, प्रा. राजकुमारी गहलोत, अर्चना उमरीकर, दत्तात्रय कोळेकर यांची समायोचित भाषणे झाली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नीता दागडिया, गायत्री भायेकर, राजकुमारी गहलोत, दूरसंचार अधिकारी शिल्पा जावळे जाधव,स्मिता कडगे, संध्या पोपशेटवार, शोभा चव्हाण, मेघा कोळेकर,जयश्री घेवारे, कविता जैन, वसुधा भानेगावकर, जयश्री जाधव, मंजू यादव, सावित्री सिद्धापुरे, नारायणीबाई यादव यांचा माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांच्या हस्ते प्रत्येकी रुपये तीनशे ची भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश निलावार यांनी तर आभार शिल्पा जावळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, धोंडोपंत पोपशेठवार, नारायणसिंह चव्हाण, एस. पी. जाधव, बसवंत घेवारे, गोविंद दुम्पलवार यांनी परिश्रम घेतले. दागडिया परिवारातर्फे महाशिवरात्रीनिमित्त सर्वांची चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाच्या सकाळीच कार्यक्रम घेतल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे महिला वर्गात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here