Home उतर महाराष्ट्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा-डुंगरवाल महसूलमंत्री विखे पाटील यांच्या कडे मागणी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा-डुंगरवाल महसूलमंत्री विखे पाटील यांच्या कडे मागणी.

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_082555.jpg

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा-डुंगरवाल
महसूलमंत्री विखे पाटील यांच्या कडे मागणी.

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी- मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान केले. अहमदनगर जिल्ह्यात द्राक्ष ,पपई केळी, पेरू अनेक फळ बागा, रबी ज्वारी तसेच कापूस पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळे झाले. नेहमीप्रमाणे शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून पीक मोठी करायची आणि हाता तोंडाशी घास आला की निसर्गाने तो हिरावून घ्यायचा हे नेहमीचेच झाले आहे.आता सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी आम आदमी पार्टी चे तिलक डुंगरवाल यांनी महाराष्ट्र महसूलमंत्री तसेच अहमदनगर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या राज्यभर गारपीट ,मुसळधार पाऊस सगळीकडे सुरू आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळते आहे .यामध्ये हातात तोंडाशी आलेला घास हिसकावला जातो आहे .यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना वर्षभर आपल्या शेतीत काबाडकष्ट करून पिकवलेला माल हा असा अस्मानी संकटामुळे नेस्तनाभूत होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे .
परंतु सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना आर्थिक मदत प्राप्त व्हावी अशी मागणी आपचे तिलक डुंगरवारल यांनी
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याकडे केली आहे

Previous articleअहमदनगर उत्तर शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आनंद आश्रम ठाणे येथून जाहीर
Next articleश्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here