Home नाशिक जीवा शिवाचा ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन

जीवा शिवाचा ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन

114
0

आशाताई बच्छाव

IMG_20240227_081357.jpg

जीवा शिवाचा ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन

किर्तन केसरी हभप संजय नाना धोंडगे यांचे सावरगाव येथील सांगता कार्यक्रमात प्रतिपादन

दैनिक युवा मराठा निफाड नाशिक प्रतिनिधी (रामभाऊ आवारे)

सावरगाव तालुका निफाड येथे खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त वर्ष ५१ वे गादी ग्रहण सोहळा व किर्तन महोत्सव निमित्ताने किर्तन केसरी हभप संजय नाना धोंडगे मकरंदवाडी देवळा यांची काल्याची किर्तन सेवा संपन्न झाली .या प्रसंगी बोलताना महाराजांनी सांगितले की काला हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे . इतर संप्रदायात काला सांगितला जातो परंतु वारकरी संप्रदायात श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळंबरोबर जो काला केला .अगदी तसाच्या तसा काला वारकरी सप्ताह मध्ये केला जातो . जीवा शिवाची ऐक्य सांगणारे काल्याचे किर्तन म्हणजे प्रसन्नतेचे कीर्तन.
काला हे त्याग,समर्पण, विश्वास,परीपुर्णतेचे किर्तन असुन
सामान्य माणसाला प्रसाद रुपी काला हा काल्याचे किर्तनातुन मिळत असतो वाळवंटात केलेला काला– भगवान कृष्णाच्या चरित्राचा विचार म्हणजे काला आहे. यमुनेने अंतर्मनाने सांगितले तुम्ही जरा माझ्या जवळ थांबा…पण ही थांबायची वेळ नाही असे भगवंतांनी सांगितले.कारण कृष्णा ला माहीत होते आपल्याला यमुना गोकुळात जाऊन देणार नाही.यमुनेने वसुदेवाला बुडवायला सुरुवात केली तेव्हा कृष्णांनी आत्मचिंतन केले तेव्हा लक्षात आले. आता युक्ती केली पाहिजे. कृष्णाने यम्मीच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्यासाठी यमुनेची मैत्रीण गंगा भगवंताने करंगळीतुन गंगा प्रकट केली लगेच कृष्ण गोकुळात गेले.यमुनेला जेव्हा कळाले कृष्ण गेले.. मायेच्या पलीकडे परमात्मा आहे.माया कंसाच्या ताब्यात दिली..कंसाने हातात धरून ठेवली…माया सोडुन… कृष्ण संगती करा.
भगवंताच्या लिला अगाध लिलाचे यावेळी वर्णन करतांना
राधेला पाहून भुलले हरी असे सांगितले.काल्याचे वाङ्मयात तीन प्रकार आहेत दहीभात ,आभेद आणि काला असे असून काल्याच्या कीर्तनात तीन प्रकारचे अभंग घेतले जातात . बाळक्रीडा , गवळणी आणि काला .दुसऱ्यांना खाऊ घालण्याची भारतीयांची संस्कृती आहे . भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा फक्त उच्चार करायचा कारण भगवंताने गोकुळात समाजकारण केले म्हणून भगवंताने अनेक अवतार घेतले त्यापैकी गर्गसंहितेत सहा महत्त्वाचे सांगितले अंश , अंशांश , आवेश ,कला , पूर्ण ,परिपूर्णतम भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम् असून कृष्ण म्हणजे काळा ,कृष्ण म्हणजे काळ आणि कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा असे कृष्ण नामाचे चे तीन अर्थ होतात .
नको आम्हासवे गोपाळा!येऊ ओढाळा तुझ्या गाई! कोण नावे त्यांच्या लागे! मागे मागे येरझारी!!
हा जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग घेऊन महाराजांनी काल्याची किर्तन सेवा केली .वैकुंठा मध्ये सर्व काही आहे परंतु काला नाही म्हणून तो अवीट असणारा काला खाण्याकरता आम्ही पुन्हा वैकुंठातून मृत्यू लोकात परत येऊ . कारण संत संगतीमध्येच काला मिळतो म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा काला वाळवंटात केला जातो कारण वाळवंटाचे तीन गुण आहेत बरे , नीट आणि उत्तम असे तीन गुण आहेत . काल्यात भारतीय संस्कृती पहावयास मिळते . स्वतः जेवण ही प्रकृती , दुसऱ्याचं हिसकावून घेणं ही विकृती आणि दुसऱ्याला जेवू घालन ही संस्कृती .काल्याचा विषय भगवान श्रीकृष्णाचे चरित्र .काल्याचे ठिकाण वाळवंट , काल्याचा देव भगवान कृष्ण , काल्यासाठी भक्त गोपाळ ,भक्तीच अविट सुख जन्म लुटायचे तेच महापुरुष प्रतिज्ञा करतात म्हणून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली आणि त्यांची प्रतिज्ञा पूर्णत्वास ही गेली .
ज्यावेळेस कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी सर्व चिंता पळून गेली गोकुळामध्ये आनंद झाला . भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या त्या लिहिल्याचे वर्णन करून महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये जो काला केला तो काला देऊन सर्व गोपाळांना तृप्त केले. अशा पद्धतीने श्रीकृष्णाच्या आघात जिल्ह्यांचे विविध उदाहरणे दाखले प्रमाण सिद्धांत देऊन महाराजांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी संगीत साथ महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य ह भ प विकास महाराज बेलुकर त्रंबकेश्वर, ह भ प ओंकार महाराज रायते खडक माळेगाव, तर गायनाची उत्कृष्ट साथ हभप नवनाथ महाराज चव्हाण रेडगाव, मिलिंद महाराज अजंग वडेल, सुभाष महाराज बेंडके, सोपान महाराज आदींनी केली तर ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव बल्हे या बालगोपाल भजनी मंडळांनी भजनी मंडळींनी साथ दिली. शेवटी दहीहंडीचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद आणि कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वारकरी संप्रदायाचे पाईक बाबाजी पाटील कुशारी यांनी केले तर शंकर भाऊ कुशारे यांनी आपले मनोगतातून कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Previous articleभावनांचे विश्व
Next articleसंत रोहिदास महाराज हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here