Home नांदेड नरसी येथील जीवन विकास प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

नरसी येथील जीवन विकास प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

144

आशाताई बच्छाव

IMG-20220906-WA0021.jpg

नरसी येथील जीवन विकास प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा
================

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नरसी येथील जीवन विकास प्राथमिक शाळेत दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नरसीकर सह शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते सातवीचे विद्यार्थी हेच शिक्षकाच्या भूमिकेत होते. थोडक्यात स्वयं प्रशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पहीली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे धडे दिले. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक नंदकिशोर नरसीकर बोलताना म्हणाले की, शिक्षक हा जीवनाच्या शिल्पकार असतो व आपल्या आयुष्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. त्यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Previous articleमुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेखर पाटील तर सचिव पदी विजय बनसोडे यांची निवड….
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या केलेल्या गौरवाने आम्हा शिक्षकांना प्रेरणा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.