Home नांदेड जिजाऊ ज्ञानमंदिरात आनंद बाजाराला उदंड प्रतिसाद.

जिजाऊ ज्ञानमंदिरात आनंद बाजाराला उदंड प्रतिसाद.

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20230123-WA0113.jpg

जिजाऊ ज्ञानमंदिरात आनंद बाजाराला उदंड प्रतिसाद.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूल मध्ये दि. २२ रोजी आयोजित हळदीकुंकू व आनंद बाजार कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा, महिला भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळाला . यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद्‌घाटन
ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. शारदाताई विरभद्र हिमगीरे व पालक प्रतिनिधी म्हणून सौ. जोशी मॅडम प्रमुख पाहुण्या व संचालिका सौ. शकुंतला जोगदंड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर आनंद बाजार कार्यक्रमाचे उद्घाटन मुखेडचे पोलीस उपनिरीक्षक श्री. नरहरी फड, उपनिरीक्षक गजानन काळे यांचे हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून कंधारचे ग्लो अँड ग्लो पब्लिक स्कूल चे संस्थाचालक शंतनू कैलासे , मुखेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक केंद्रप्रमुख डॉ. शिवाजी कराळे, संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड, मुख्याध्यापक जगदीप जोगदंड, संचालक जगदीश जोगदंड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचा आरंभ वडजे मॅडम यांनी गायीलेल्या जिजाऊ वंदनाने व विनिता चव्हाण व सचिन सुर्यवंशी सरांच्या स्वागतगीतांनी झाला. दिप प्रज्वलन व जिजाऊ प्रतिमेच्या पुजनानंतर प्रमुख उपस्थित मान्यवरांचा सत्कार जिजाऊ ज्ञानमंदिर शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख शिवाजी कराळे यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल व बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंमलबजावणी व परिणामकारक त्याचा अभ्यास या विषयात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून पीएचडी मिळवल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जेष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ. सौ . शारदाताई हिमगीरे यांनी जिजाऊ ज्ञानमंदिर शाळेच्या प्रगतीशील वाटचालीबद्दल कौतुक केले व समाधान व्यक्त केले. पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती असते. त्यामुळे विद्यार्थी पालकांपेक्षा ही गुरुवर अधिक विश्वास ठेवतात. पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना जोशी मॅडम म्हणाल्या की , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी व आनंददायी शिक्षण देणारी शाळा म्हणजे जिजाऊ ज्ञानमंदिर शाळा आहे. आमच्या मुलांना या शाळेत पुढील वर्गांचे सुद्धा शिक्षण मिळावे व आम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची वेळ येवू नये असे वाटते . महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा येथेच मिळावे असे वाटते. शंतनू कैलासे सर म्हणाले की, पालक वर्ग नांदेड सारख्या ठिकाणी आपल्या पाल्याला ठेवून शिक्षणासाठी भरमसाठ खर्च करीत आहेत मात्र खर्चाच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा म्हणावा तेवढा विकास झालेला दिसत नाही. आपले स्थानिक मराठी माध्यमाचे शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत सरस ठरत आहेत. जिजाऊ ज्ञानमंदिर ही शाळा कौटुंबिक जिव्हाळा व आनंदायी शिक्षण देणारी आहे.
संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड यांनी बालवयातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती व मुळ भांडवल नफा, तोटा, शिल्लक या गोष्टीतून व्यवसायातील यश अपयश, ‘ व्यवहार चातुर्य या गोष्टीचा अनुभव यावा म्हणून खरी कमाई अर्थात आनंद बाजार चे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. मकर संक्रातीचे औचित्य साधून पालक बंधु, भगिनी व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हळदी कुंकू कार्यक्रमाचे व आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना तीळगुळ व जनरल नॉलेजची पुस्तके वाण म्हणून भेट देण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येनी पालक बंधूभगिनी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन परवीन शेख मॅडम यांनी केले. दरम्यान पुण्यनगरी चे पत्रकार संदीप कामशेट्टे यांची नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या संघटकपदी निवड झाल्याबदल त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दै.लोकराज्य चे संपादक ज्ञानेश्वर डोईजड, पत्रकार महेताब शेख यांची जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री न्यूज चॅनलचे पत्रकार विठ्ठल पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी आनंद बाजारातील खाद्य पदार्थांचा चांगलाच आस्वाद घेतला. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या संयुक्त सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here