Home अमरावती दीक्षांत समारंभात ११८ सुवर्ण, २२ रौप्य, २४ रोख रोख पारितोषकाचे वितरण,

दीक्षांत समारंभात ११८ सुवर्ण, २२ रौप्य, २४ रोख रोख पारितोषकाचे वितरण,

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_205818.jpg

दीक्षांत समारंभात ११८ सुवर्ण, २२ रौप्य, २४ रोख रोख पारितोषकाचे वितरण,
———-
दैनिक युवा मराठा.
.पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ दीक्षांत समारंभ आज शनिवारी पार पडला, राज्यपाल रमेश बैसऑनलाईन तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्षप्रा. दीपक कुमार श्रीवास्तव या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ११८ सुवर्ण, २२ रौप्य, आणि २४ रोख पारितोषकाचे वितरण करण्यात आले. विद्यापीठच्या मराठी विभागाची विद्यार्थिनी वैष्णवी मुळे सहा सुवर्णपदकाची कमाई करून यावर्षी दीक्षांत समारंभ वर स्वतःची छाप पाडले. अकोटच्या श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहल इंदाने हिने द्वितीय तर पीडीएमसीच्या डॉ. गुंजन गुप्ता हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. स्नेहल व गुंजन ने प्रत्येकी ५ सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याशिवाय रोख व इतर परिचय ही या तिघींना देण्यात आली
विद्यापीठ परिसरात तयार करण्यात आलेल्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मंचावर कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्रा.-कुलगुरू डा. प्रसाद वाळेगावकर, फुल सचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू, प्राचार्य डॉ आर डी सीकची, अधिष्ठाता डॉ विवेचन नगरे, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. काकडे उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यपाल रमेश बैस म्हणाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. अमरावती शहराची वेगळी ओळख महाराष्ट्रात आहे. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळेल व त्यांचे कौशल्य वाढेल या दृष्टीने विद्यापीठ अभ्यासक्रम तयार करावेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कार्य करून विद्यार्थ्यांना स्कील प्रदान करणारे अभ्यासक्रम सुरू करावेत. असे सांगून महामही राज्यपलांनी सर्व पदी प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही ज्ञानाचे दूध आणि बदलाचे एजंट म्हणून जगात पाऊल टाका. स्वप्नाची पूर्तता करा असे सांगून यु जी सी चे उपाध्यक्षप्रा. दीपक कुमार श्रीवास्तव म्हणाले, शिक्षण हे ज्ञान प्राप्त करणे मूल्य रुजविणे, शहाणपणा वाढविणे एवढेच नसून जीवनात अमूल्य परिवर्तन सुद्धा घडवून आणत आहे. या समारंभात २०० ऊन अधिक संशोधकांना आजच्या दे पदवीने सन्मानित करण्यात आले. याशिवाय सलग्नित महाविद्यालयामधील ३९ हजार १८४,तर सोयत्य महाविद्यालयातील१ हजार ९२९ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आली. त्याचवेळी २४४ विद्यार्थ्यांना पदवी का सुद्धा प्रदान करण्यात आल्या. गेली दोन वर्षे इतरत्र पार पडलेल्या दीक्षांत समारंभ यावर्षी पूर्ववत विद्यापीठ परिसरात आयोजित केल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी अतिथींचा परिचय करून दिला व संचालन डॉ. प्रणव कोलते व डॉ. सुलभा पाटील यांनी केले.

Previous articleटेंभुर्णीत भारतीय जनता पार्टीचा लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न 
Next articleपत्रकार डी. जी .रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे यांचा लवारी /उमरी येथील लोककला मेळाव्यात सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here