Home राजकीय माझा मृत्यु झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार

माझा मृत्यु झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार

160
0

🛑 माझा मृत्यु झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार -हर्षवर्धन जाधव 🛑
औरंगाबाद:( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

औरंगाबाद ⭕औरंगाबादच्या कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधव केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. मला त्रास दिल्यास मी आत्महत्या कारेन अशी धमकी त्यांनी दानवे यांना दिली आहे. प्रापर्टीवरून वाद झाल्याचे या व्हिडिओतून वरकरणी दिसून येत आहे. या व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मला तुमच्या मुलीशी संसार करायचा नाही असेही ते म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना हिचे पती हर्षवर्धन जाधव यांनी फेसबुकवरून एक व्हिडीओ सर्वत्र शेअर केला आहे. यामध्ये प्रॉपर्टीवरून त्यांना त्रास दिला जात असल्याचे वरकरणी दिसून येते आहे.
मी हर्षवर्धन बंगला तुमच्या मुलीला देतो. पण जो प्लॉट आहे तो माझ्या वडिलांचा आहे. माझ्या आईचा आहे आणि तो माझ्या नावावर आहे जो मी देणार नाही असे ते म्हणाले आहेत. तुम्ही प्रापर्टीसाठी काहीही करू शकाल असेही ते म्हणतात. ते म्हणाले आहेत, ‘२०,००० कोटींची प्रॉपर्टी आहे पण १० कोटी तुम्ही सोडणार नाही मला माहित आहे.’ मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर तुमचे रेकॉर्डिंग सर्वत्र व्हायरल होईल असा दमही त्यांनी दिला आहे.

हर्षवर्धन यांनी मी आता कोचीन ला जात आहे मला काही त्रास दिला तर मी सायनाईडच्या पिल्स माझ्यासोबत ठेवल्या आहेत अशी धमकी दिली आहे. तसेच माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही दिला. तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही गुंड प्रवृत्तीचेच आहात असा आरोप त्यांनी केला आहे. तुमच्या मुलीला काही राजकीय मदत लागली तर मी करेन मात्र इथून पुढे तिच्याशी संसार मी करू शकणार नाही असे ते म्हणाले…

Previous articleलँकडाऊन ५.० ची घोषणा! ३०जूनपर्यंत लँकडाऊन
Next articleदिलासादायक” नांदेड येथुन आज पुन्हा ४ जणांना सुट्टी, तर दिवसभरात एका रुग्णांची भर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here