Home अमरावती कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन...

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन संपन्न

58
0

आशाताई बच्छाव

IMG_20240221_092440.jpg

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय येथे छात्रसंघ वार्षिकोत्सव स्नेहसंमेलन संपन्न _ मयुर खापरे चांदुर बाजार प्रतिनिधी.…. 20 फेब्रुवारी – पीपल्स वेल्फेअर सोसायटी, अमरावती संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्न चांदूरबाजार येथील कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच वार्षिक उत्सव दिनांक 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती परवाच्या निमित्ताने 19 व 20 फेब्रुवारीला घेण्यात आला. या वार्षिकोत्सवाचा उद्घाटन समारंभ दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या विकास समितीचे सन्माननीय सदस्य स्वप्निल उर्फ भाई देशमुख हे होते तर पीपल्स वेल्फेअर सोसायटीचे सचिव यांनी या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले याप्रसंगी शिवचरित्रावर बोलण्याकरता प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी व कला व वाणिज्य महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.राजेश मिरगे हे व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.व्हि.डी. चोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.राजेश मिरगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक कार्यकर्तुत्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज त्यांची बुद्धीप्रमाणे वादी असणारी दुरुस्ती रयते सोबत असणारा व्यवहार आणि अनेक गड किल्ल्यांची माहिती मोघलांसोबत झालेला संघर्ष यावर अत्यंत अभ्यासू असे व्याख्यान दिले. तर उद्घाटकीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव प्रा.अभय दादा देशमुख यांनी विद्यार्थी दशेमध्ये आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनातून वाव मिळत असतो आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. तर समारंभाचे अध्यक्ष स्वप्निल उर्फ भाई देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अशा उपक्रमांचा उपयोग होतो व त्याकरिता सक्रियपणे अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. तद्वतच हे स्नेहसंमेलन झाल्यानंतर अभ्यास साकडे सुद्धा लक्ष द्यावे असे ते म्हणाले प्रारंभी अतिथींचे स्वागत प्रारंभी प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता चोरे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख व स्नेहसंमेलना मागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून विशद केली प्रारंभी महाविद्यालयाचे संगीत विभागाचे प्रमुख प्रा. शहाणे व यांच्या चमुने प्रा. शहाणे यांच्या नेतृत्वात स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व पी.एच.डी. प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी करिता कार्यक्रम प्रभारी प्रा.डॉ. राऊत सर व प्रा.डॉ. जे.वाय. पडोळे मॅडम तसेच प्रा. डॉ. अनिल वैद्य, प्रा. डॉ. विनय वसुले, प्रा. डॉ. सहारे, प्रा. डॉ. खडसे, प्रा. डॉ. नीना चवरे, प्रा. डॉ. मीना वैद्य, , प्रा. डॉ. अमोल वारे, प्रा. राजुरीया, प्रा. चुके, प्रा. डॉ. देशमुख, श्री अनिल भाकरे. अनिकेत वानखडे व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here