Home अमरावती खोदकाम करताना आढळली कौंडण्यपूर मध्ये प्राचीन मूर्ती: कौंडण्यपूर येथे अनेक पुरातन वास्तू...

खोदकाम करताना आढळली कौंडण्यपूर मध्ये प्राचीन मूर्ती: कौंडण्यपूर येथे अनेक पुरातन वास्तू व साहित्य संपदा.

62
0

आशाताई बच्छाव

IMG_20240211_160157.jpg

खोदकाम करताना आढळली कौंडण्यपूर मध्ये प्राचीन मूर्ती: कौंडण्यपूर येथे अनेक पुरातन वास्तू व साहित्य संपदा.
———
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (कौंडण्यपूर)
विदर्भाची पंढरी जशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपुरात माता रुक्मिणी मंदिरीला लागूनच एका घरात खोदकाम सुरू होते. त्यावेळी खूप कामात कोरलेली प्राचीन मूर्ती आढळून आली आहे. अनन्यपूर्ण येथील रहिवासी शोभा बबनराव डंबे यांच्या घरात ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती ब्रह्म, विष्णू ,महेश या देवतांचे असावी, अशी चर्चा गावात सुरू होती. अमरावती जिल्ह्यातील विदर्भाची कौंडण्यपूर प्राचीन राजधानी, माता रुक्मिणीचे माहेर व कुलस्वामिनी अंबिका मातीची शक्तीपीठ असलेल्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कोंढणपूरला प्राचीन इतिहास लाभलेला असून त्याची प्रचिती व पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक पुरातन वस्तू व साहित्य संपदा आजही आहे. या ठिकाणी अनेक वेळा पुरतत्व विभागाने संशोधन केले असून, काही पुरावे आढळले आहे. अशातच आता आणखीन एक मूर्ती समोर आली आहे. ही मूर्ती अखंड पाषणाचे असून त्यावर तीन प्रतिकृती कोरलेल्या दिसत आहेत. याबाबतची माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली असून, सध्या ही मूर्ती जवळच असलेल्या शिवमंदिर येथे डोंबे कुटुंबीयांनी विधिवत पूजा अर्चना करून ठेवली आहे. मूर्तीच्या दर्शनासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे घरात खोदकाम सुरू असताना कामगारांना एकाच दगडावर कोरलेले तीन मूर्ती दिसून आली. आम्ही त्याची विधिवत पूजा करून ही मूर्ती सध्या शिव मंदिरात दर्शनासाठी ठेवली आहे. यापूर्वीही अशीच मूर्ती निघाली होती. बबनराव डोंबे घर मालक असून त्यांनी पुरातत्त्व ला माहिती दिली आहे. प्राचीन इतिहास असलेल्या कौंडण्यपुरात खोदकाम केल्यास अनेकअवशेष आढळून येतात. यापूर्वी जमिनीत आढळून आलेल्या मूर्ती व इतर अवशेष हे पुरातत्त्व विभागाने सांभाळून ठेवले असून, शनिवारी सापडलेल्या मूर्ती बाबत त्यांना माहिती दिली आहे. मंदिराचे विश्वस्त अतुल ठाकरे यांनी आमच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली आहे.

Previous articleरावळगाव चॉकलेट आता पुन्हा गजबजणार “पान पसंद” ची चव पुन्हा चाखायला मिळणार…!
Next articleआनंद मेळावातून व्यावहारिक ज्ञान मिळते : शेळके
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here