Home नाशिक विश्वकर्मा योजना वेबसाईट बंदमुळे लाभार्थी जेरीस

विश्वकर्मा योजना वेबसाईट बंदमुळे लाभार्थी जेरीस

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240209_073628.jpg

विश्वकर्मा योजना वेबसाईट बंदमुळे लाभार्थी जेरीस

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड नाशिक प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ गाजावाजा करून बरेच दिवस झाले आहे. मात्र योजनेची वेबसाईटच बंद असल्याने विश्वकर्मा बांधव नोंदणीसाठी सेतू व ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारून जेरीस आले आहे. पारंपारिक व्यवसायातील कौशल्याला वाव देऊन त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने २६ जानेवारी रोजी पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केल्यानुसार ग्रामीण बरोबरच शहरी भागातील विश्वकर्मा बांधव कामधंदा सोडून कागदपत्र घेऊन सेतू व ग्रामपंचायत कार्यालयात जात आहेत. मात्र तासंतास तीष्टत उभे राहून देखील विश्वकर्मा योजनेची वेबसाईट ओपनच होत नाही. आणि झाली तरी लाभार्थी चा आधार नंबर लिंक नाही असा चुकीचा मेसेज संगणक दाखवत आहे. तसेच दोन-तीन वेळेस ओटीपी द्यावा लागूनही सदर योजनेत नाव समाविष्ट होत नसल्याने, आहे त्या रोजंदारीचा काम धंदा सोडून तीन चार दिवस हेलपाटे मारून देखील नाव नोंदले जात नसल्याने खेरवाडी पंचक्रोशीतील विश्वकर्मा बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तरी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी विश्वकर्मा योजना वेबसाईट तात्काळ सुरळीत करून लाभार्थ्यांचे कार्यालयीन हेलपाटे व वेळ वाचवावा असे संताप जनक आवाहन विश्वकर्मा संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आहेर व तालुक्यातील विश्वकर्मा बांधवांनी केले आहे.

Previous articleरस्ते विकास कामांचा आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न
Next articleमुंबई पोलीस शुभम आगोणे हत्याप्रकरणातील एका आरोपीला धुळ्यातून अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here