Home जळगाव ७ दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य हा शब्द आमदार मंगेश...

७ दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही – ना. गिरीश महाजन..

64
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_072618.jpg

७ दिवसात आरटीओ कार्यालय सुरु करून दाखवले, अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही – ना. गिरीश महाजन..

चाळीसगाव येथे MH 52 उपप्रादेशिक परिवहन कार्यालायचे उद्घाटन सह विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न,

MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना अर्पण – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय चाळीसगाव येथे होणं सोपं नाही. आमदार मंगेश चव्हाण कुठलंही काम हाती घेतल्यावर पूर्ण करतात ते तालुक्याचा विकास करीत आहेत त्यांनी सतत पाठपुरावा करून RTO कार्यालयाचे काम मंजूर करून आणले. दूरदृष्टी असलेला आमदार, नेता तालुक्याला मिळाला आहे. अशक्य हा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांना माहित नाही असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या येथील महात्मा फुले कॉलनीतील शहीद हेमंत जोशी क्रिडांगण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कार्यालय व नवीन वाहनाना MH 52 नोंदणी शुभारंभ सह विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ प्रसंगी चाळीसगाव येथे ते बोलत होते.
चाळीसगाव येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याला पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार संजयभाऊ सावकारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, शेंदुर्णी येथील संजयदादा गरुड, दुध संघ संचालक रोहित निकम, पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार, मधुभाऊ काटे, अमोल नाना पाटील, यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,दळवळण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यानिमित्ताने मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन वाहन धारकांना MH52 नंबर ची पासिंग नोंदणी देण्यात आली.
ते म्हणाले की मोदी सरकार मध्ये सर्व कामे होत आहेत देश सुसाट सुटलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय फक्त 7 दिवसात सुरु करून नूतन कार्यालयासाठी 40 कोटी रुपये देखील मंजूर करून घेतले आहेत चाळीसगाव तालुक्यात मंगेश चव्हाण यांनी जनतेसाठी सर्वच कार्यालये केली आहेत आता फक्त विमानतळ आणणे बाकी आहे असे कौतुक देखील त्यांनी केले. मी गेली 6 टर्म आमदार म्हणून निवडून आलो, तुमच्या कडून देखील मला हिच अपेक्षा आहे अशा शुभेच्छा देखील दिल्या.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालक मंत्री यांनी देखील आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक केले ते म्हणाले की चाळीसगाव व भडगाव येथे MH 52/MH54 हे RTO कार्यालय झाले आमदार किशोर पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांचे काम चांगलं आहे. चाळीसगाव च्या कार्यालयामुळे जवळपास 120 कि मी चं अंतर कमी होवून अपघाताचं प्रमाण देखील कमी होणार असून चाळीसगाव ची MH 52 ही दुसरी ओळख झाली आहे आमदार म्हणून दमदार काम मंगेश दादांनी केलं चाळीसगाव तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना अर्पण – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असून राज्यात नव्हे तर देशभरात MH52 ही आपली वेगळी ओळख निर्माण होणार आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली, ना.गिरीशभाऊ महाजन यांनी विश्वास दाखवला आणि चाळीसगाव तालुक्याच्या जनतेने आशिर्वाद दिले म्हणून मी हे काम करू शकत आहे. त्यामुळे MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना नम्रपणे अर्पण करत आहे.
राज्यात गेल्या 13 वर्षात राज्यात कुठेच RTO कार्यालय मंजूर झाले नाही. प्रशासकीय स्तरावर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. ना.गिरीश भाऊंचे आशिर्वाद तसेच महायुती सरकार यामुळेच हे कार्यालय मंजूर करणे शक्य झाले. चाळीसगाव तालुक्यात जवळपास सव्वालाख वाहने आहेत या वाहनांचे पासिंग, फिटनेस आदी कामासाठी जवळपास 120 किमी जळगांव येथे जावे लागत होते ते आता होणार नसून सर्व कामे चाळीसगाव येथे होणार आहेत. तसेच सदर मैदानावरील कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालय बांधकामासाठी बिलाखेड येथील शासकीय जागा मागणी केली आहे व इमारत बांधकामाचा ३७ कोटींचा प्रस्ताव देखील पाठवला आहे.

यासोबतच चाळीसगाव तालुक्यात आज एकाच वेळी चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या 259 घरांच्या वसाहतीचे बोढरे येथे भूमिपूजन, तालुका क्रीडा संकुल येथे नूतनीकरण व अद्ययावतीकरण आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील २०२१ मधील महापूरग्रस्तांना ६ कोटींची मदत मिळाली असून दुष्काळग्रस्तांसाठी 133 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहेत, लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व तिसऱ्या क्रमांकाचे शहर मात्र साधी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नव्हती, नाट्यगृह नव्हत, आज चाळीसगाव शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, कोर्ट, उत्पादन शुल्क, नाट्यगृह, रेस्ट हाउस, पोलीस हौसिंग आदी इमारती काम सुरु असून व काही काम पूर्ण देखील झाले आहेत. पदापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी माझा प्रयत्न असल्याचे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Previous articleआज शनिवारी वाशिम येथे आयुष्यमान भारत कार्ड वाटप व भव्य आरोग्य शिबिर
Next articleआमदार मंगेश चव्हाण भाऊबीज सोहळा ठरला हजारो आशा –अंगणवाडी सेविका यांच्यासाठी मोठा आधार,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here