Home भंडारा पहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे...

पहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे -चौकशीची मागणी

655

आशाताई बच्छाव

IMG_20240203_075200.jpg

पहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे -चौकशीची मागणी

७.६० किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाकरता 24.90 निधी मंजूर

दैनिक युवा मराठा प्रतिनिधी यांनी घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-पहेला ते अंभोरा तीर्थक्षेत्र पुलाकडे जाणाऱ्या ७.६० किलोमीटर रस्त्या बांधकामाकरता 24.90 कोटी रुपये मंजूर झाले असून त्या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले व रस्त्याच्या बांधकामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे .रस्त्याच्या बाजूला सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू असून खुदाई एक फूट करण्यात आली असून त्यामध्ये दीड इंची बोर्डर , ४० एम एम गिट्टीचा वापर करण्यात येत नाही. यामध्ये सरळ मुरूम ऐवजी मातीचा वापर करण्यात येत आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून रस्त्याचे कोणतेही खोदकाम न करता सरळ त्यावर गिट्टी ,बारीक चूरीचा वापर करून डांबरीकरण करण्यात येत आहे .सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट असून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा येत्या आठ दिवसात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद वंजारी व कुलदीप गंधे यांनी मीडियाच्या माध्यमातून केलेली आहे

Previous articleकायद्याच्या वर्दीतल्या दर्दी विधीज्ञा…
Next articleतहसीलदारांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक तहसील कार्यालयाच्या परिसरात चार तास ठिय्या, तहसीलदार वैभव पिलारे यांची बदली करा निवेदनातून मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.