Home नाशिक कायद्याच्या वर्दीतल्या दर्दी विधीज्ञा…

कायद्याच्या वर्दीतल्या दर्दी विधीज्ञा…

80
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_074437.jpg

कायद्याच्या वर्दीतल्या दर्दी विधीज्ञा…
नाशिक दि. २-(अँड विनया नांगरे प्रतिनिधी)
नाशिक जिल्हा न्यायालयात काळया कोटचा रुबाब, आदरयुक्त भीती आणि अभ्यासू जरब निर्माण करणाºया महिला विधीज्ञांनी वर्दीतही दर्दी आणि हौशी कलाकार असतात हे दाखवून दिले.
सालाबादप्रमाणे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असणाºया महिला वकीलांच्या आयोजन समितीच्यावतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. यंदाही आयोजन समितीच्यावतीने हा सुबक स्रेह मेळावा जिल्हा न्यायालय आवारात सोमवार, दि. ३० जानेवारी रोजी उत्साहाने पार पडला. सर्व महिला न्यायाधीश व सरकारी वकील, पोलिस कर्मचारी यांनी या कार्यक्रमांत आपला सहभाग आपुलकीने नोंदवला.
यावेळी आयोजित केलेल्या उखाणे, मेहंदी, गायन आणि एकांकीका स्पर्धेत स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. अ‍ॅड. वृषाली रकिबे, अ‍ॅड. वसुंधरा रामराजे, अ‍ॅड. अपर्णा कुलकर्णी, अ‍ॅड. पुष्पा ढवळे, अ‍ॅड. वैशाली कोकाटे, अ‍ॅड. निलोफर शेख या विजेत्या झाल्या. विजेत्यांना आयोजन समितीच्यावतीने ट्रॉफी देण्यात आली.
आयोजक समीतीच्यावतीने अ‍ॅड. सोनल कदम, अ‍ॅड. श्रद्धा कुलकर्णी, अ‍ॅड. स्वप्ना राऊत, अ‍ॅड. पूनम शिनकर, अ‍ॅड. प्रणिता कुलकर्णी, अ‍ॅड. राणी रंधे-तळेकर, अ‍ॅड. सुप्रिया आमोदकर , अ‍ॅड. अश्विनी गवते व अ‍ॅड. सोनल गायकर, यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.तसेच आयोजकाना अँड विनया नागरे यांनी सहकार्य केले.

Previous articleबीडकरांचे रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न कधी होईल साकार ?
Next articleपहेला ते अंभोरा पुलिया पर्यटन स्थळी जाणाऱ्या डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे -चौकशीची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here