Home बीड बीडकरांचे रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न कधी होईल साकार ?

बीडकरांचे रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न कधी होईल साकार ?

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_073936.jpg

बीडकरांचे रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न कधी होईल साकार ?

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:०२ काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारकडून परळी-बीड- अहमदनगर रेल्वे मार्ग साठी २७५ कोटी रुपयांची तरतूद केली. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने ठेवल्याप्रमाणे केंद्र जेवढी रक्कम देईल तेवढीच रक्कम राज्य सरकार देईल या रेल्वे मार्गाची निर्मिती केली जाईल. धोरणानुसार सातत्याने काम होत राहिले तर निश्चितपणे हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल असे वाटत असले तरी मात्र बीडकरांचे प्रत्यक्ष रेल्वेत बसून प्रवास करण्याचे स्वप्न साकार कधी होणार प्रश्नाचे उत्तर काही केंद्र सरकार असो की राज्य सरकार यांच्याकडून मिळत नाहीये. यामुळे दरवर्षी केंद्र असो की राज्य असो दोन्ही सरकारांच्या बजेटमध्ये या रेल्वेमार्गासाठी कितीही कोटी रुपयांची तरतूद पुण्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांद्वारे समोर येत असल्या तरी जोपर्यंत हा रेल्वे मार्ग पूर्ण तयार होऊन त्यावर रेल्वे धावत नाही. आणि त्यात बीडकरांना बसून प्रवास करता येत नाही तोपर्यंत काही खरे नाही. दरवर्षी बजेट सत्रामध्ये केंद्र सरकारकडून या रेल्वे मार्गासाठी काहींना काही निधीची तरतूद करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक वेळी बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व संसदेत जे कोणी खासदार असतात त्यांच्या प्रयत्नास यश,बीडकरांचे स्वप्न पूर्ण होणार बीडला रेल्वे येणार-धावणार, लोकांची सोय होणार रेल्वे आल्याने एमआयडीसी मध्ये नवनवीन उद्योग, येतील यामुळे औद्योगिक दृष्ट्या बीड जिल्ह्याला लाभ होईल. ऊसतोड कामगारांना ऊस तोडी शिवाय तर धंदे किंवा इतर काम मिळेल अशा नाना कल्पना व वल्गना दरवर्षी केंद्र सरकारच्या बजेट सत्रानंतर करण्यात येतात परंतु या वल्गना आतापर्यंत कल्पना विश्वातील भासच सिद्ध होत आल्या आहेत.२६१.२५ किलोमीटर एवढा लांबलचक असलेला प्रलंबित रेल्वे मार्ग असून आत्तापर्यंत फक्त ६६.१८ किलोमीटर मार्ग पूर्ण झाला आहे. उर्वरित १९५.०७ एवढ्या लांबलचक मार्गाचे काम होणे अजून बाकीच आहे. म्हणजेच एकूण असलेल्या रेल्वे मार्गापैकी आत्तापर्यंत एकूण २५% रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर ७५% रेल्वे मार्गाचे काम अजून बाकी आहे. निजामकाळापासून प्रलंबित असलेला हा रेल्वे मार्ग स्वातंत्र्यानंतर पाहून शतक उलटूनही आपल्या स्वतंत्र भारत देशातील केंद्र व राज्य सरकारांना अद्याप पर्यंत पूर्ण करता आलेला नाही. ही खूप खूप मोठी शोकांतिका आहे. यामुळे दरवर्षी केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांनी कितीही कोटी रुपयांची तरतूद केल्याचे आकडे समोर आणले तरी त्याचा उपयोग नाही. पेक्षा या रेल्वे मार्गाचे काम तीव्र गतीने व आलेल्या निधीचा परिपूर्ण वापर करून होणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीसह जबाबदार अधिकाऱ्यांनीही अत्यंत तळमळीने व अंग झटकून या रेल्वे मार्गात लक्ष घालणे व लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा बीडकरांच्या अजूनही कित्येक पिढ्या फक्त आमच्या बीडला रेल्वे येणार या प्रतीक्षेतच जातील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Previous articleमहाशिवरात्री यात्रा महोत्सवात अंभोरा येथे सर्व सुविधा उपलब्ध करा -सरपंच जयश्री वंजारी यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
Next articleकायद्याच्या वर्दीतल्या दर्दी विधीज्ञा…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here