Home नाशिक व-हाणे प्रकरणात आता होणार न्याय! तीन वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश!!

व-हाणे प्रकरणात आता होणार न्याय! तीन वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश!!

231
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240125_080841.jpg

व-हाणे प्रकरणात आता होणार न्याय! तीन वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश!!
उपोषण आंदोलन तुर्तास स्थगित…
(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ)
नाशिक – युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिलेल्या आमरण उपोषण आंदोलनाच्या इशा-यानंतर काल प्रशासनाने तातडीने दखल घेत उपोषणतील मागण्या तात्काळ सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.
व-हाणे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे व सरपंच सौ अनिता पवार यांच्या कार्यकाळातील खोट्या व बनावट ग्रामसभा आणि अनागोंदी कारभाराच्या विरोधात हे उपोषण आंदोलन काल बुधवार दिनांक २४ जानेवारी पासून विभागीय आयुक्त कार्यालय समोर सुरू केले जाणार होते, तथापि मालेगावचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार हे सतत उपोषणकर्ते राजेंद्र पाटील राऊत यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधून उपोषण करू नये म्हणून विनवण्या करीत होते.दरम्यान काल बुधवारी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षाताई फडोळ बेडसे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात येऊन व-हाणे प्रकरणात ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा सांळुखे व सरपंच सौ अनिता पवार यांचेवर अत्यंत शीघ्र गतीने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन वर्षाताई फडोळ बेडसे यांनी दिल्यामुळे सदरचे उपोषण आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले.तर विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त श्रीमती भावके मॅडम व सहाय्यक आयुक्त मनोजकुमार तात्याराव चौधर यांचेसमवेत झालेल्या बैठकीत देखील तात्काळ कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्याने हे उपोषण आंदोलन थांबविण्यात आले.या उपोषण आंदोलनासाठी काल युवा मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हारुण भाई शेख, चांदवड तालुकाध्यक्ष सुनील गांगुर्डे, सुदर्शन बर्वे, महाराष्ट्र न्युजचे संपादक भारत पवार, तौफिक अतार, इम्तियाज अतार आदी जण उपस्थित होते.

Previous articleराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अवघा मुक्रमाबाद शहर राममय
Next articleआश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने ध्वजारोहण संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here