Home पुणे उरळीकांचन-जेजुरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा..! 🛑

उरळीकांचन-जेजुरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा..! 🛑

172
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 उरळीकांचन-जेजुरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा..! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज )

उरुळी कांचन :⭕ पुणे- सोलापूर महामार्गाला जोडला जाणारा जवळचा रस्ता म्हणून वाहनचालक उरुळी कांचन ते जेजुरी या रस्त्याचा वापरला करतात. मात्र मागील काही दिवसापासून या रस्त्यावरून सतत अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे मृत्युच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये काहींनी आपला जीव गमावला आहे. तर काहीं जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.जेजुरी- उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घाटात सोमवारी (ता. १७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
विश्वनाथ दासू हिप्परकर (वय-२२, रा. जुजारपूर ता. सांगोला, जि. सोलापूर) असे कंटेनर चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या महिनुसार, विश्वनाथ हिप्परकर हे संभाजी ट्रान्सपोर्टमध्ये (सांगोला जि. सोलापूर) कंटेनर चालक म्हणून काम करतात. ते कंटेनर क्रमांक एमएच ४६ एच ३१५० चालवितात.शिंदवणे घाटात अपघात झाल्याची माहिती मिळताच, उरळीकांचन दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी दिलीप कुंजीर यांच्या मालकीच्या दोन क्रेनच्या सहाय्याने कंटेनरला रस्त्यावरून बाजूला हटविण्यात आले. यावेळी शिंदवणे येथील विशेष पोलीस अधिकारी (SPO) प्रवीण देशमुख यांची टीम, पोलीस पाटील मोहन कुंजीर आणि स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य मिळाले. यामुळे उरुळी कांचन-जेजुरी रस्त्यावरील खंडित झालेली वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, उरुळी कांचन-जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे घाटात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या घाटामध्येअरुंद रस्ता, तीव्र उतार, वळणे आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.⭕

Previous article🛑 पुण्याच्या मुलाने चंद्राचा आजवरचा सर्वात सुस्पष्ट फोटो मिळवलाय…त्याने हे कसं शक्य केलं…? 🛑
Next article🛑 म्युकरमायकोसिस’च्या दहा रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here