Home नांदेड राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अवघा मुक्रमाबाद शहर राममय

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अवघा मुक्रमाबाद शहर राममय

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20240123_080248.jpg

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अवघा मुक्रमाबाद शहर राममय

मुक्रमाबाद प्रतिनिधी बसव्वाप्पा वंटगिरे 

अयोध्या नगरी येथील प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मुक्रमाबाद (खडकेश्र्वर) शहरात सर्व मंदिरात महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आले
येथील महादेव मंदिर, वीरभद्र मंदिर, गणपती मंदिर, भवानी मंदिर, विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, नरसिंह मंदिर, बालाजी मंदिर, खंडोबा मंदिर, लक्ष्मी मंदिर,बिरदेव मंदिर,ईतर सर्व मंदिरात महाआरती करण्यात आले.शहरातील मुख्य मार्केट मध्ये सर्व व्यापारी श्री राम प्रभु च्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
ठीक ठिकाणी कार सेवक यांचे सत्कार करण्यात आला.
मार्केटच्या मुख्य दर्शनी भागात विधुत रोशनाई करण्यात आले भगवे झेंडे व फेटे बांधून फटाके वाजवून जल्लोषात श्री रामाचे स्वागत करण्यात आले
मारोती मंदिर ते भवानी चौक, गणपती मंदिर, मुख्य बाजारपेठ,बस स्थानक,येथुन राम मंदिर भुमी पुजन पर्यंत मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने राम भक्त नाचत गाजत महीला व पुरूष बालकांनी हातात झेंडे घेऊन जय श्रीराम जय श्रीराम यांच्या जयघोषाने मुक्रमाबाद शहर दुमदुमली
वीरभद्र मंदिर खडकेश्र्वर येथील महाआरती कैलासआप्पा आवडके, सुरेश पंचाक्षरे, मल्लिकार्जुन खळुरे, श्रीकांत आवडके,शिवायप्पा वंटगिरे यांनी केले.
मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नागरिकांनी जागोजागी यात्रेचे फटाके वाजवून स्वागत केले. सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, श्रीराम मूर्तीचे भव्य फलक यांनी रस्ते सजले होते.

Previous articleमाहोरा येथे अयोध्या येथील श्री राम मंदीर स्थापन दीना निमीत्त पालखी सोहळ संपन्न
Next articleव-हाणे प्रकरणात आता होणार न्याय! तीन वर्षांच्या लढ्याला अभूतपूर्व यश!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here