Home उतर महाराष्ट्र रामभक्तांचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधानांनी केले पूर्ण, २२ जानेवारीला एक दिवा घरोघरी ,...

रामभक्तांचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधानांनी केले पूर्ण, २२ जानेवारीला एक दिवा घरोघरी , “श्रीराम दिपावली” साजरी करावी, युवा मराठा महासंघ संघटक दिपक जाधव यांचे आवाहन

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20240118_071613.jpg

रामभक्तांचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधानांनी केले पूर्ण, २२ जानेवारीला एक दिवा घरोघरी , “श्रीराम दिपावली” साजरी करावी, युवा मराठा महासंघ संघटक दिपक जाधव यांचे आवाहन

वासखेडी /धुळे/नंदुरबार- येथील २२जानेवारी रोजी घरोघरी, प्रत्येक मंदीरात प्रत्येकांनी एक दिवा आपल्या घरी करूया साजरी हीच खरी श्रीराम दिपावली,अयोध्या येथे रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची देशवासीयांन सह जगाला उत्सुकता आहे रामलल्लाच्या प्रतिष्ठापना दिनी अर्थात दि. २२ जानेवारी रोजी ‘श्रीराम दिपावली’ नावाने एक विशेष दिवा प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्याचे आवाहन युवा मराठा महासंघ संघटक दिपक जाधव यांनी देशवासीयांना केले आहे, घरातील प्रत्येक माता, भगिनींना नम्र आवाहन करतो की,आपण देखील “श्रीराम दिपावली” निमित्ताने घरासमोर तसेच मंदीरात,रामलल्लांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढून एक अनोखी “श्रीराम दिवाळी” साजरी करावी, घरातील देवालयात देखील दिवा लावून, श्रीरामांच्या प्रतिमेचे घरोघरी माता भगिनींनी देखील पुजन करावे, राममंदिर व्हावे ही तमाम रामभक्तांची इच्छा होती, तशीच अयोध्येत राममंदिर व्हावे, ही तमाम देशवासीयांची, देखील मनापासून इच्छा होती, देशवासीयांच्या मनात एकच विचार, मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे, पण देशाचे एक आदर्श पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ,यांनी मंदिर देखील बनवले, तारीख देखील सांगितली आणि उद्घाटन देखील होणार आहे, देशातील तमाम रामभक्त दि. २२ जानेवारीची वाट बघत आहेत, संपुर्ण देशात रामभक्तांनी घराघरांत अक्षता व आमंत्रण पत्रिका देखील वेळोवेळी पोहोचवल्या आहेत, तमाम रामभक्तांना अयोध्येला प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्याचे आमंत्रण देखील दिले आहे, दि. २२ जानेवारीला राममंदिरचे उद्घाटन झाल्यावर सगळ्या रामभक्तांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे, त्या वेळी तुम्ही सगळ्यांनी अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन दिपक जाधव यांनी केले, आज केवळ जिल्ह्यात, महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगात राममंदिरबाबत उत्सुकता आहे आणि आकर्षण आहे, कोट्यवधी रामभक्त त्या ठिकाणी गेल्यावर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अयोध्या नगरी सजली आहे, सजवली आहे, देशासाठी अयोध्या हा विषय उत्साह आणि श्रद्धेचे प्रतिक आहे, तर राममंदिर हे देशाचा अभिमान असल्याचे दिपक जाधव यांनी नमूद केले.

Previous articleमहिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.
Next articleअनं २६ वर्षांनी मिळाले बालपण साकोली सेकंडरी एज्युकेशन सोसायटी शाळेचे बालमित्र आले एकत्र
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here