Home बीड महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

71
0

आशाताई बच्छाव

IMG_20240118_070537.jpg

महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल.

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:१७  जिल्हा परिषदेने केलेल्या निलंबन कारवाईत सहभाग असल्याच्या राग मनात धरून आपणास सहा महिन्यापासून त्रास देणाऱ्या शिक्षकाने घराच्या पाठीमागे नेऊन विनयभंग केल्याची तक्रार धारूर येथील एका कर्मचारी महिलेने केली. यासंदर्भात धारूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. धारूर तालुक्यातील रमेश विष्णू नखाते (रा.आवरगाव ता.धारूर) याने अंजनडोह केंद्राचे तत्कालीन प्रभारी केंद्रप्रमुख असताना २६ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी कलम ४२० भांदवीनुसार गुन्हा दाखल होता. याप्रकरणी नखाते यास निलंबित केले होते. दरम्यान निलंबनामध्ये सहभाग असल्याचा समज करून नखाते हा मागील सहा महिन्यापासून त्रास देत होता. तसेच ११ जानेवारी रोजी घरापासून काही अंतरावर भेटून शारीरिक सुखाची मागणी करून धमकी दिल्याचे संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२४ रोजी कलम ३५४,३५४ (ड) ५०४,५०६ प्रमाणे भांदवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here