Home भंडारा कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे एक दिवशीय प्रबोधन शिबिर

कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे एक दिवशीय प्रबोधन शिबिर

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240115_174159.jpg

कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे एक दिवशीय प्रबोधन शिबिर

अनिस चे 30 लाख रुपयाचे आव्हान -अंगात येणाऱ्य देवी देवतांनी जिंकले नाही

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )साकोली तालुक्यातील कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह येथे देव अंगात येणाऱ्या देव्या नाचत गाजत येत असतात. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे 30 लाख रुपयांची आव्हान देण्यात आले तरी पण आजपर्यंत कोणी जिंकले नाही .याप्रसंगी नायब तहसीलदार जयश्री रंगारी ,महाराष्ट्र प्रदेश संघटक हरिभाऊ पातोडे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, रत्नाकर तिडके ,जिल्हाध्यक्ष मदन बाडेबुचे ,राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ येवले, माजी सभापती रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते चूनिलाल वासनिक, डॉ अशोक कापगते, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कल्पना पथे, ग्यांनचंद जांभुळकर, मूलचंद कुकडे, प्रबोधनकार तनुजा नागदेवे, कव्वाल मनोज कोटांगले , इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
प्रबोधन कार्यक्रमांमध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक डी जी रंगारी , रत्नाकर तिडके, जिल्हाध्यक्ष मदन बांडेबुचे, रेखाताई वासनिक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे रामभाऊ येवले, प्रबोधनकार तनुजा नागदेवे, तरी मान्यवरांनी मार्गदर्शन केले व अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरिता व देशात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याकरिता प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रयोगासहित प्रात्यक्षिका प्रबोधन करण्यात आले त्यामध्ये जिल्हा संघटक डी जी रंगारी , ग्यांनचद जांभुळकर, कागदराव रंगारी, बी एल मेश्राम, यशवंत उपरीकर यांनी प्रयोगातून मार्गदर्शन केले व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला.
अंगात देव्या आणणाऱ्या महिलांना आव्हान देण्यात आले पाण्याचे रूपांतर रक्तात करून दाखवा तसेच भाजला पापड मंत्राने फोडून दाखवा, मंत्राने आमच्या माईक बंद करून दाखवा व 30 लाख रुपये मिळवा असेही आव्हान देण्यात आले
हजारो लोकांनी या प्रबोधनाचा लाभ घेतला या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डी जी रंगारी, बी एल मेश्राम, के एस रंगारी, यशवंत उपरीकर, नामदेव काणेकर प्राध्यापक अशोक गायधने ,अमित नागदेवे,आशा वासनिक, कार्तिक मेश्राम ,
साकोली अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी खूप मेहनत घेतली.

Previous articleचिखलपहेला येथे आपला संकल्प विकसित भारत कार्यक्रम संपन्न
Next articleअनसिंग येथील राजस्थानी महिला मंडळाचा देव भागवत कार्यक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here