Home बुलढाणा तलाठ्यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी !

तलाठ्यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी !

198
0

आशाताई बच्छाव

IMG-20230818-WA0069.jpg

तलाठ्यांना सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत नवीन शासन निर्णय जारी !

बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तसेच शेतक-यांशी निगडित पीक पाहणीची ई-पिक पाहणी या मोबाईल अॕप द्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी हे अतिशय महत्वाचा दुवा आहेत. परंतु तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्या बाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासनास तक्रारवजा सूचना / निवेदने प्राप्त होत असतात. सद्यस्थितीत तलाठी गट-क संवर्गाची एकूण मंजूर पदे १५७४४ इतकी असून त्यापैकी ५०३८ इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात येतो. उक्त रिक्त तलाठी पदांपैकी ४६४४ तलाठी पदे भरण्याच्या अनुषंगाने दि.२६.०६.२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
तलाठ्यांनी सज्जा मुख्यालयी उपस्थित राहण्याबाबत शासन निर्णय: तलाठ्यांना सजातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळपाहणी, वरिष्ठ कार्यालयांकडे असणाऱ्या बैठका, राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या इत्यादी कामी उपस्थित रहावे लागते. यास्तव अपवादात्मक परिस्थितीत तलाठी यांना सज्जा मुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही. सबब एकापेक्षा जास्त गावाकरीता एकच तलाठी असल्याने तलाठ्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सज्जाच्या ठिकाणी/गावाच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. याकरीता यापूर्वी दि.०६.०१.२०१७ च्या शासन पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु प्राप्त परिस्थितीत रिक्त तलाठी पदांची भरतीप्रक्रिया पूर्ण होवून उमेदवार उपलब्ध होईपर्यंत एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार राहणार आहे. तथापि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरीता सर्व तलाठी यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालये व अन्य शासकीय इमारतींवर लावण्याबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-2023/प्र.क्र.91/ई -10 मंत्रालय, मुंबई दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार खालीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहे (१) तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा/ बैठका / कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालय तसेच संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात दिसेल अशा पध्दतीने सूचना फलक आगाऊ वेळेत लावावा. (२) तलाठ्यांनी सज्जा कार्यालयीन ठिकाणी उपस्थितीबाबत वेळापत्रक निश्चित करुन सदर वेळापत्रक संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात आगाऊ वेळेत लावावे. तसेच सदर वेळापत्रक संबंधित मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठविण्यात यावे.
(३) तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरुपात लावावा. तसेच संबंधित सज्जाचे मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नांव दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुध्दा दर्शविण्यात यावेत.
(४) जनतेस कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख / कार्यालयीन प्रमुख / तलाठी कार्यालये यांच्या निदर्शनास सदर निर्देश आणावेत.

Previous articleमराठवाड्यातील मराठा आरक्षणाला राज्य शासनाकडून गती
Next articleसकारात्मक विचार व कृतीतच सन्मानाने जगण्याचा मार्ग – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here