Home भंडारा अड्याळ येथील फुलचंद नंदनवार तरुणाने सिलिंग फॅनला नायलान दोरीने गळफास लावून केली...

अड्याळ येथील फुलचंद नंदनवार तरुणाने सिलिंग फॅनला नायलान दोरीने गळफास लावून केली आत्महत्या

100
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_073235.jpg

अड्याळ येथील फुलचंद नंदनवार तरुणाने सिलिंग फॅनला नायलान दोरीने गळफास लावून केली आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली असल्याची सर्वत्र चर्चा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील अड्याळ येथील रहिवासी फुलचंद मोतीराम नंदनवार वय 37 वर्षे राहणार कोष्टी मोहल्ला वार्ड क्रमांक 1 यांनी नायलान दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,यातील मृतक फुलचंद नंदनवार यांच्यावर बँक ,पतसंस्था तसेच लोकांकडून हात उसने घेतलेल्या पैशाच्या कर्ज होता. त्यामुळे तो टेन्शनमध्ये राहून त्या कर्जाची परतफेड कशी करणार! यावरून मनावर परिणाम करून 9 जानेवारीला सायंकाळी 4 वाजे पूर्वी यातील मृतकाने त्यांच्या राहत्या किरायाच्या घराचे बेडरूम मध्ये घरी कोणी हजर नसताना बेडरूम मध्ये सिलिंग फॅनला नायलान दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे .फिर्यादी खेमचंद मोतीराम नंदनवार वय 43 वर्षे राहणार कोष्टी मोहल्ला वार्ड क्रमांक 1 यांच्या तोंडी तक्रारीवरून 9 जानेवारी 2024 ला 4 वाजे पूर्वी पोलीस स्टेशन दाखल केला. कायमी गर्ग क्रमांक 01 / 2024 कलम 174 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दाखल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक इंगोले असून तपास अधिकारी सुद्धा पोलीस उपनिरीक्षक इंगोले करीत आहेत.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार समारोह व विशेष बैठकीचे आयोजन
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ परभणी येथे २ फरवरीला भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here